एक्स्प्लोर

#BoycottSadak2 बॉयकॉट सडक 2 ट्रेंडिंग, नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद चर्चेत आला होता मात्र कालांतराने त्याच्यावरील चर्चा शांत झाली होती, मात्र हॉटस्टारवर रिलीज होणार असलेल्या 'सडक 2' या चित्रपटामुळे हा विषय पुन्हा वादात आला आहे.

मुंबई : डिस्ने हॉटस्टारने एक दोन नव्हे तर तब्बल सात सिनेमांची घोषणा केली आहे. भुज, लक्ष्मी बॉम्ब, बिग बुल, सडक 2, दिल बेचारा, लूटकेस आणि खुदाहाफिज असे सिनेमे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हॉस्टस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. सिनेसृष्टीत या घोषणेनं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात नेटकऱ्यांची चंगळ होणार आहे आहेच, पण ही घोषणा होऊन 24 तास उलटायच्या आतच एक नवा ट्रेंड येऊ लागला आहे, हा आहे बॉयकॉट सडक 2 चा ट्रेंड! सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझम चर्चेत आला. इंडस्ट्रीत नेपोटिझम जोरावर असल्यामुळेच सुशांतवर ही वेळ आल्याचं तरुणाईला वाटतं. त्याचा थेट फटका सडक 2 या चित्रपटाला बसला आहे. सडक 2 हा नेपोटिझमचं उत्तम उदाहरण आहे असं सांगत हा सिनेमा न बघण्याचं आवाहन सुशांतचे फॅन्स करू लागले आहेत. ट्विटरवर हा ट्रेड जोरावर आहे. त्याचवेळी चित्रपटाचे निर्माते महेश भट आणि रिया चक्रवर्तीचे फोटोही व्हायरल होऊ लागले आहेत. महेश भट आणि रियाच्या संबंधांवरही अनेक टिप्पण्या होऊ लागल्या आहेत. रिया ही सुशांतसिंहची मैत्रीण होती. याचे दाखले देत महेश भट आणि रियाच्या फोटोचा संबंध सुशांतसिंहशी लावण्याचे प्रकारही होत आहेत. एकीकडे नेपोटिझम आणि दुसरीकडे रिया-महेश भट यांचा व्हायरल होणारा फोटो यामुळे सध्या बॉयकॉट सडक 2 हा ट्रेंड जोरावर आहे. दुसरीकडे वरुण धवनने इन्स्टाग्रामवर लाईव्ह मुलाखती घेऊन हॉटस्टारच्या सिनेमांची घोषणा केली. यात लक्ष्मी बॉम्बचा मुख्य नायक अक्षयकुमार, भुजचा नायक अजय देवगण, सडक 2ची मुख्य नायिका आलिया भट, बिग बुलचा नायक अभिषेक बच्चन हे कलाकार लाईव्ह होते. यांच्याशी वरुण धवनने बातचित केली होती. या लाईव्ह मध्ये खुदा हाफिजचा नायक विद्युत जामवाल नव्हता. शिवाय, लूटकेसचा नायक कुणाल खेमूही नव्हता. या लाईव्हबद्दल विद्युत जामवालने मात्र आपण या लाईव्ह मध्ये नसण्याबद्दल नाराजी नोंदवली. चित्रपट हॉटस्टारने घेतला याबद्दल आनंद व्यक्त करतानाच आपण कालचं लाईव्ह मिस केलं अशी सूचक टिप्पणी त्याने केली. या लाईव्हमध्ये असलेले वरुण धवन, अभिषेक बच्चन, आलिया भट आणि अजय देवगण ही मंडळी असल्यामुळे त्यालाही पुन्हा नेपोटिझमचा वास येऊ लागल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या धक्क्यातून अजून तरुणाई सावरलेली नाही. अशावेळी नव्या सिनेमांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा नेपोटिझम चर्चेत आला आहे. सूर्यवंशी दिवाळीत?
अनेक मोठे सिनेमे ओटीटीवर येत असताना रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी मात्र थिएटरमध्येच रिलीज होणार आहे. त्याची ग्वाही खुद्द रोहित शेट्टीनेच दिली होती. हॉटस्टारने जाहीर केलेल्या सिनेमांनंतर सूर्यवंशी आता दिवाळीत येण्याची तयारी करत असल्याचं बोललं जातंय. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. तर 83 हा चित्रपट नाताळमध्ये रिलीज करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हा चित्रपट ओटीटीवर यावा म्हणून या सिनेमाला 144 कोटींची ऑफर देण्यात आली होती. पण ती नाकारून हा चित्रपट थिएटरमध्येच लीज करण्यावर सध्यातरी निर्माते ठाम आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Embed widget