Border 2 First Look:डोळ्यांत अंगार अन् भळभळत्या जखमा; 'बॉर्डर 2'मधला अहान शेट्टीचा फर्स्ट लूक पाहिलात?
‘बॉर्डर 2’चा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Border 2 First Look: आज सकाळी 'बॉर्डर 2' च्या (Border 2) टीमने सिनेमा प्रेमींना मोठं सरप्राईज दिलं आहे. निर्मात्यांनी आहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करतात चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातात टॅंकची गन, डोळ्यात निखारे चेहऱ्यावर भळभळत्या जखमा आणि कानठळ्या बसवणाऱ्या युद्धाची गर्जना करताना दिसतोय. त्याच्या या ॲक्शनने भरलेल्या लूकवर चाहते अक्षरशः भारावले आहेत. अनेकजण त्याची तुलना वडील सुनील शेट्टी यांच्याशी करू लागले आहेत. बॉर्डरमधील सुनील शेट्टींनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
Ahan Shetty: चाहत्यांना भुरळ पाडणारा आहानचा पोस्टर लुक
नवीन पोस्टरमध्ये अहान शेट्टी कॉम्बॅट-रेडी नेव्हल ऑफिसरच्या गेटअपमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर रक्ताचे ठसे, हातात शस्त्र… असा त्याचा धडाकेबाज अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. याआधी सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाले होते. दिलजीत यात भारतीय वायुदलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
‘बॉर्डर 2’चा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी लिहिलय की, भारतीय सिनेमात अहानला जी खरी ओळख अजून मिळाली नाही, ती ओळख त्याला ‘बॉर्डर 2’ नक्कीच देईल. एका फॅनने लिहिलं, “काय भन्नाट लूक आहे! अहानची खरी धमाकेदार एंट्री आता बॉलिवूडमध्ये होणार आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “अहान अगदी आपल्या वडिलांसारखा सुनील शेट्टींसारखा दिसतोय. पोस्टर पाहून असं वाटतंय की ‘बॉर्डर 2’मध्ये अन्ना स्वतःच आहेत.”
सुनील शेट्टींची आठवण करून देतोय अहानचा लूक
सुनील शेट्टी यांनी ‘बॉर्डर’मध्ये साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात आजही ताजी आहे. त्यांच्या त्या खास कॅरेक्टरमुळे त्यांचं नाव या चित्रपटाशी कायम जोडलं जातं. आता त्यांचा मुलगा, अहान शेट्टी ‘बॉर्डर 2’चा भाग असल्यामुळे दोघांची तुलना होणे स्वाभाविक आहे. चित्रपटात अहानने नेमकं कसं काम केलं आहे, हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. परंतु सध्यातरी पोस्टर पाहून चाहते त्याच्यावर खूप इम्प्रेस झाले आहेत आणि त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत.
1997 मध्ये आलेला ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होता. लोंगेवालाच्या लढाईवर आधारित असलेल्या या चित्रपटात एका छोट्या भारतीय सैन्यदल मोठ्या पाकिस्तानी हल्ल्याला तोंड देताना दाखवले होते. सनी देओल यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात भारतीय युद्धपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला होता .सुनिल शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी याने 2021 मधील ‘तडप’ या अॅक्शन-रोमँस चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. ‘बॉर्डर 2’ हा त्याचा दुसरा महत्त्वाचा सिनेमा ठरणार असून यानंतर तो एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे.























