Anil Kapoor and Boney Kapoor : घरोघरी मातीच्या चुली! बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्या नात्यात दुरावा, बोलणंही टाकलं; नेमकं काय घडलं?
Anil Kapoor and Boney Kapoor : अनिल कपूर यांनी बोनी कपूर यांच्याशी बोलणं टाकलं असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी स्वत: केला आहे. दरम्यान या दोन्ही भावांमधील वादाचं नेमकं कारण काय याविषयी जाणून घेऊयात.
Anil Kapoor and Boney Kapoor : प्रत्येक घरामध्ये भावंडामधील वाद हे काही नवीन नसतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी असलेल्या वादाला मराठीत घरोघरी मातीच्या चुली ही म्हण अगदी योग्य पद्धतीने बसते. बोनी कपूर (Boney Kapoor) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) हे बॉलीवूडमधील जितके दिग्गज कलाकार आहेत, तितकच त्यांच्यातील भावंडाचं नातं हे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं. आतापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात या दोन्ही भावंडांच प्रेम हे प्रेक्षकांनी पाहिलंय. त्यामुळे त्यांच्यातील प्रेमाची देखील तितकीच चर्चा होत असते. पण सध्या या दोन्ही भावांमध्ये दुरावा आल्याचं समोर आलं आहे. इतकच नाही तर अनिल कपूर यांनी बोनी कपूर यांच्यासोबत बोलणंही टाकलं असल्याचं स्वत: बोनी कपूर यांनी सांगितलं.
बोनी कपूर यांनी नुकतच्या दिलेल्या एका मुलखतीदरम्यान यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही भावांमध्ये दुरावा असल्याचं समोर आलंय. इतकच नाही तर अनिल कपूर यांनी बोनी कपूर यांच्याशी सध्या कोणत्याही प्रकारचा संवाद केला नसल्याचं समोर आलं आहे. याचं कारण ठरलंय बोनी कपूर यांचा आगामी नो एन्ट्री हा सिनेमा. पण या सिनेमामुळे नेमकं या भावंडांमध्ये काय झालं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
दोन्ही भावंडांमध्ये अबोल्याचं 'हे' आहे कारण
बोनी कपूर यांचा नो एन्ट्री या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोझांज ही स्टारकास्ट दिसणार आहे. यावर बोलताना बोनी कपूर यांनी म्हटलं की, मी माझा भाऊ अनिलला नो एंट्रीच्या सिक्वेलबद्दल आणि त्यातील स्टारकास्टबद्दल सांगण्याआधीच ही बातमी लिक झाली. त्यामुळे तो चिडला. ते लीक होणे दुर्दैवी होते. मला माहित आहे की त्याला नो एंट्रीच्या सिक्वेलचा भाग व्हायचे होते, पण जागा नव्हती. मी जे केले ते मी का केले हे मला स्पष्ट करायचे होते, पण त्याआधीच त्याला ही बातमी समजली.'
वरुण आणि अर्जुन चांगले मित्र आहेत. त्यामुळे स्क्रिनवरही त्यांची जोडी चांगली जमेल. दिलजीतही कमाल आहे, त्याचे खूप चाहते आहेत. मला आजच्या काळासाठी ते रिलेटेबल करायंच होतं. त्यामुळे मी ही स्टारकास्ट निवडली. पण अनिल मात्र माझ्याशी अजूनही बोलत नाहीये. त्याला या चित्रपटात काम करायची खूप इच्छा होती. पण तो हे सगळं समजून घेईल आणि लवकरच सगळं सुरळीत होईल, असा आशावाद देखील यावेळी बोनी कपूर यांनी व्यक्त केला आहे.