एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता आमीर खान आणि किरण रावला स्वाईन फ्लूची लागण
बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्यानं आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना, किरण रावसह आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्यानं आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना, किरण रावसह आपल्याला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती दिली.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल आज जाहीर होत आहेत. यासाठी पुण्यातल्या बालेवाडी इथं या सोहळ्याचं भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता शाहरुख खान, मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोक उपस्थित आहेत.
अभिनेता आमीर खानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी त्यानं बोलताना, माझ्यासह किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याने, कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं. तसेच आपल्या खास आग्रहास्तव शाहरुख खानने या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचंही तो यावेळी म्हणाला.
दरम्यान, या कार्यक्रमात मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांनी मराठीत भाषण केलं.
गेल्या वर्षी 3 तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांचा समावेश होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षीसं दिली जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement