दिवाळीनिमित्त रणबीर आलियाचा हटके लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दिवाळीनिमित्त बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने आपल्या खास लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्टने दिवाळीनिमित्त आपल्या खास लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दिवाळी निमित्त अभिनेता रणबीर कपूरने लाल रंगाचा कुर्ता वेअर केला होता. या लूकमध्ये रणबीर हँडसम दिसत होता. हा फोटो रणबीरच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच दिवाळी निमित्त आलिया भट्ट पिंक लेहेंग्यात दिसून आली. रणबीर आणि आलियाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आलिया भट्टने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया अत्यंत सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टने फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन दिलं आहेत. तिने लिहिलं आहे की, 'या दिवाळीत काही वेगळं करायचं होतं. त्यामुळे यावेळी मी वेगळा लूक ट्राय केला. हा लेहेंगा अनेक अद्भूत लोकांच्या कष्टाचं प्रतिक आहेत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा.' फोटोंमध्ये आलियाने एक स्टनिंग लूक कॅरी केला आहे. तिने इयरिंग आणि बिंदीच्या मदतीने आपला लूक कम्प्लिट केला आहे. आलियाच्या या फोटोंवर 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, आलिया आणि रणबीर दोघेही लवकरच 'ब्रह्नास्त्र' या चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शिक केला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. तसेच अभिनेता नागार्जुनही या चित्रपटात दिसून येणार आहेत. चाहते बीग बी आणि नागार्जुन या दोन बड्या अभिनेत्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'माऊली'चं माऊली प्रेम, रितेश देखमुखने शेअर केला अनोखा व्हिडिओ
अभिनेता रितेश देशमुखचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखने एक व्हिडिओ शेअर केलाय. आईच्या जुन्या साडीपासून त्यांने स्वत:ला आणि त्याच्या दोन मुलांसाठी कुर्ता शिवला आहे आणि त्यावर आधारित एक अनोखा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. आईची जुनी साडी, तिच्या मुलांसाठी दिवाळीचे नवे कपडे असे सांगत त्यांने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याची पत्नी जेनेलियाला त्यामध्ये टॅग करण्यात आले आहे. रितेशच्या या 19 सेकंदाच्या व्हिडिओत तो स्वत: त्याची दोन मुलं आणि आईसह दिसतोय. हा व्हिडिओ त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने शूट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :























