Singham Again: सिंघम अगेनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, रावण सीतेचा 'हा' सीन उडवला, रामायणाच्या या संदर्भांवर आक्षेप
सिंघम अगेनच्या मोस्ट अवेटेड ट्रेलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
Singham Again: रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सिंघम अगेनची सध्या जोरदार चर्चा आहे. एक नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा येणार आहे. भुलभुलय्या 3 आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांच्या तिकिटाचे आणि स्क्रीन चे वाद सुरू असतानाच आता सिंघम अगेन या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री लागली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात एकूण 12 सीन उडवले आहेत तर काही सीन्समध्ये बदल करण्याचा सल्ला ही दिलाय. काही सीन्स ची काटछाट करत या चित्रपटाला U/ सर्टिफिकेट देण्यात आला आहे.
सिंघम अगेनमधील रामायणाच्या संदर्भावर आक्षेप
सिंघम अगेन सिनेमात दाखवण्यात आलेल्या रामायणाच्या एका संदर्भावर आक्षेप घेण्यात आला आहे. सिंघम सिंबा आणि अवनी यांच्यासोबत रामायणातील भगवान राम , सीता आणि हनुमानाचा 23 सेकंदाचा सीन जोडण्यात आला आहे. यामध्ये प्रभू रामाच्या चरणांना स्पर्श करतानाचा सिंघमचा सीन सुधारण्यास सांगण्यात आला आहे.
हे सीन पूर्णपणे कापले
याशिवाय एका सीन मध्ये रावण देवी सीता यांना ओढत नेतानाचा सीन दाखवण्यात आलाय. हा सीन 16 सेकंदापर्यंत कापण्याचे सांगण्यात आला आहे. तर अर्जुन कपूरचे पात्र झुबेर ने स्वतःची तुलना राक्षस राजा रावणाशी केली आहे. यातील अर्जुन कपूरच्या ओळी हटवण्यास सांगण्यात आला आहे. एका दृश्यात जुबेरची ओळ: तेरी कहानी तेरे चाहते को भेज... ही ओळ सुधारण्यास सांगण्यात आला आहे.
धार्मिक भजन हटवले, ध्वजाच्या रंगातही बदल
सिंघम अगेन या चित्रपटात एकादृश्यात निर्मात्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये शिवस्तोत्र टाकण्यात आलं होतं. हे शिव स्तोत्र हटविण्यास सांगण्यात आला आहे. सेंसोर बोर्डाने एकादशी आता दाखवण्यात आलेल्या धार्मिक ध्वजाच्या रंगात योग्य ते बदलही सुचवले आहेत.
'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल
सिंघम अगेनच्या मोस्ट अवेटेड ट्रेलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेक्षक भडकले आहेत. सिंघम अगेनच्या ट्रेलरमधील दीपिकाचा अभिनय पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्व बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरील काही नेटिझन्सने दीपिका पदुकोणच्या अभिनयावर टीका केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत पण दीपिकाच्या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका अभिनय आणि फेक ॲक्सेंटमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.