एक्स्प्लोर

Badhaai Do: लव्हेंडर मॅरेज...LGBTQ समुदायासाठी 'बधाई दो'; निषिद्ध विषयावर चर्चा घडवणारा वेगळ्या धाटणीचा चित्रपट

Badhaai Do: समाजाच्या दृष्टीने ज्या गोष्टी निषिद्ध आहेत त्यावर खुली चर्चा करायला लावणारा हा चित्रपट खरोखरच LGBTQ समुदायासाठी 'बधाई दो' ठरला आहे. 

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीत कथांचा तुटवडा असल्याचं मत अनेकजण मांडतात. पण याला खोटं ठरवलंय ते म्हणजे 'बधाई दो' या चित्रपटाने. सामाजिक आणि कौटुंबिक जडणघडणीत निषिद्ध अशा समलैंगिक लग्न या विषयावर हा चित्रपट बनवला आहे.

'बधाई दो' ही कथा शार्दुल ठाकुर (राजकुमार राव- Rajkumar Rao) आणि सुमन सिंग (भूमी पेडणेकर- Bhumi Pednekar) यांची आहे. पोलीस असलेला शार्दुल समलैंगिक समुदायाचा भाग आहे आणि पीटी शिक्षक असलेली सुमन उर्फ ​​सुमी लेस्बियन आहे. वेगळा समुदाय म्हटलं की त्या समुदायाचा स्ट्रगल हा एक वेगळ्याच प्रकारचा असतो. असाच स्ट्रगल शार्दुल आणि सुमीच्या आयुष्यात आहे आणि तोच या या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.

असं म्हणतात की लग्नाच्या जोड्या या स्वर्गात तयार होतात. पण त्या जोडप्यांचं काय ज्यांना एकमेकांसोबत तडजोड करुन राहावं लागतं? आपली सतत्या लपवून जगावं लागतं? असाच एक विवाह म्हणजे लव्हेंडर मॅरेज. हा विवाह दोन समलैंगिक व्यक्तींमध्ये होतो. लोक हा विवाह वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. सर्वात म्हत्वाचं म्हणजे 'लोग क्या कहेंगे' हे कारण त्यामागे असतं. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा हा नवा चित्रपट 'बधाई दो' याच लव्हेंडर मॅरेजवर आधारित आहे.  शार्दुल आणि सुमी हे दोघेही आपलं वास्तव लपवून त्यात मुक्तपणे जगण्याचा प्रयत्न आणि संघर्ष करत आहेत.

राजकुमार रावने पोलीस शार्दुल ठाकूरची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. राजकुमारने आपल्या व्यक्तिरेखेत अशाप्रकारे गुंतून ठेवले आहे की, तुम्हाला शार्दुल ही एक भूमिका आहे असं वाटणार नाही. दुसरीकडे, सुमीच्या भूमिकेत भूमी पेडणेकर भावूक, संवेदनशील आणि धाडसी आहे. ती लेस्बियन आहे हे तिच्या घरच्यांना सांगायला सुमी कदाचित कचरत असेल पण ती एक धाडसी मुलगी आहे.
 
शीबा चड्ढा यांनी मोजक्याच शब्दांत पण नेहमीसारखं उत्तम काम केलं आहे. सीमा पाहवा,  लवलीन मिश्रा, नितेश पांडे, गुलशन देवैया आणि Chum Darang यांनी आपली भूमिका चोख पार पाडली आहे. चित्रपटाचं संगीत आणि ध्वनी रचना खूपच चांगली आहे.  'डायरेक्टर हर्षवर्धन कुलकर्णी ने 'बधाई दो'मध्ये LGBTQ ही गोष्ट सामान्य करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.

'बधाई दो'चा पूर्वार्ध थोडा मजेत आहे, आपण आनंद घेत पाहू शकतो. पण उत्तरार्ध तुमचं मन प्रसन्न करेल आणि थोडं भावूकही करेल. हा चित्रपट तुम्हाला LGBTQ या समुदायावर बोलण्यासाठी प्रोत्साहित करेल.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्याNarendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Embed widget