Actress Career : पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करण्याची 'या' अभिनेत्रीला मोठी किंमत चुकवावी लागली; आज जगतेय 'असं' आयुष्य
Bollywood Actress : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते जितेंद्रपर्यंत (Jitendra) अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेली एक अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर आहे. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न करण्याची या अभिनेत्रीला चांगलीच किंमत चुकवावी लागत आहे.
Bollywood Actrees Career After Married Pakistani Cricketer : बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणं आणि तिथे स्वत:ला सिद्ध करणं हे हजारो लोकांचं स्वप्न असतं. पण या ग्लॅमरस जगात टिकणं सर्वांनाच जमत नाही. इंडस्ट्रीत स्वत:ला टिकवण्यासाठी एक वेगळी मेहनत घ्यावी लागते. हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार रातोरात सुपरस्टार झाले आहेत. पण एका चुकीमुळे किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे एका रात्रीत करिअर बर्बाद झालेली मंडळीदेखील आहेत. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या एका निर्णयामुळे तिचं फिल्मी करिअर एका फटक्यात संपुष्टात आलं आहे. या अभिनेत्रीने 70-80 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं आहे. करिअर पीकवर असताना अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. करिअर पीकवर असताना चुकीच्या व्यक्तीसोबत संसार थाटण्याचा अभिनेत्रीचा निर्णय चुकीचा होता. एकीकडे तिचं करिअर संपुष्टात आलं तर दुसरीकडे अभिनेत्रीचा घटस्फोटही झाला.
'या' चित्रपटाच्या माध्यमातून केलेलं पदार्पण
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केलेल्या अभिनेत्रीने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते जितेंद्र (Jitendra), राज बब्बर (Raj Babbar) पासून ऋषी कपूरपर्यंत (Rishi Kapoor) अनेक टॉपच्या कलाकारांसोबत काम केलं आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडवर राज्य केलं आहे. त्यावेळी अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग होता. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्नबंधनात अडकलेल्या अभिनेत्रीचं नाव रीना रॉय (Reena Roy) असं आहे. रीना रॉयने बी.आर चोप्रा यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाने तिला चांगलीच ओळख मिळाली.
अभिनेत्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?
रीना रॉयने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, रीना रॉयचं खरं नाव सायरा अली आहे. पण सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिने तिचं नाव बदललं. रानी रॉयने 'कालीचरण', 'जख्मी','उधार का सिंदूर' आणि 'नागिन' सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. करिअर यशाच्या शिखरावर पोहोचलेलं असताना अभिनेत्रीने 1983 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत (Mohsin Khan) लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अभिनेत्रीने भारत सोडलं आणि पाकिस्तानला गेली. अभिनेत्री सिनेसृष्टीपासूनही दुरावली.
लग्नाच्या सात वर्षांत घटस्फोट
रानी रॉयच्या मुलीचं नाव जन्नत आहे. रीना रॉय आण मोहसीन खान यांचा लग्नाच्या सात वर्षांनी घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर रीना रॉय 1992 मध्ये पुन्हा भारतात आली आणि सिनेसृष्टीत कमबॅक केला. आदमी खिलोना है या चित्रपटात ती झळकली होती. तसेच अजय, गैर आणि रिफ्यूजी या चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत ती झळकली. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिचे चित्रपट कमी पडले.
रीना रॉय आता काय करतेय?
करीना कपूरच्या 'रिफ्यूजी' या चित्रपटात रीना रॉय शेवटची झळकली होती. त्यानंतर लेकीकडे लक्ष देण्याचा रीनाने निर्णय घेतला. नुकतीच ती इंडियन आयडल आणि द कपिल शर्मा या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत दिसून आली आहे. सध्या ती अभिनय कार्यशाळा घेत आहे.
संबंधित बातम्या