Vijay Deverakonda : ‘लायगर’ रिलीज आधी विजयची ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर प्रतिक्रिया, ‘लाल सिंह चड्ढा'वरही मोठं वक्तव्य!
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट पुढील आठवड्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. विजय सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Vijay Deverakonda : सध्या बॉलिवूड चित्रपट लोकांच्या निशाण्यावर आहेत. बॉयकॉट बॉलिवूड सतत ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपटावर या हॅशटॅगने बहिष्कार टाकला जात आहे. याच ट्रेंडदरम्यान 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) रिलीज झाला. या आणि यानंतर आलेल्या चित्रपटांना याचा मोठा फटका बसला आहे. बॉयकॉट ट्रेंडवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. या यादीत आता साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे नाव सामील झाले आहे. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आगामी 'लायगर' (Liger) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट पुढील आठवड्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. विजय सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापासून ते पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापर्यंतची सगळी मेहनत तो घेत आहे. सध्या अनेक मोठ्या चित्रपटांना बॉयकॉट केले जात आहे. याचा धसका आता जवळपास सगळ्याच कलाकारांनी घेतला आहे. दरम्यान आता विजय देवरकोंडा देखील यावर व्यक्त झाला आहे.
काय म्हणाला विजय देवरकोंडा?
बॉयकॉट प्रवृत्तीमुळे मनोरंजन विश्वाचे नुकसान होत असल्याचे विजय म्हणाला, यावेळी त्याने आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला समर्थन दिले. एका मुलाखतीत बोलताना विजय म्हणाला की, ‘मला वाटतं, चित्रपटाच्या सेटवर अभिनेता, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही महत्त्वाची पात्रं असतात. एका चित्रपटात दोनशे ते तीनशे लोक काम करतात. अनेक लोकांसाठी हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. त्यामुळे हे असं करणं चुकीचं आहे.’
हजारो कुटुंब रोजगाराचे साधन गमावतात!
विजय पुढे म्हणाला की, ‘आमिर खान सर जेव्हा लाल सिंह चड्ढा बनवतात, तेव्हा त्यांचे नाव चित्रपटात केवळ स्टार म्हणून दिसते, पण दोन हजार ते तीन हजार कुटुंबे त्या चित्रपटाशी जोडली गेलेली असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकता, तेव्हा तुमच्या बहिष्काराने केवळ आमिर खानलाच फरक पडत नाही, तर रोजगाराचे साधन गमावणाऱ्या हजारो कुटुंबांवर याचा परिणाम होतो. आमिर खान चित्रपटगृहांकडे गर्दी खेचणारा अभिनेता आहे. मात्र, त्याच्यावर बहिष्कार का टाकला जात आहे, हे कळत नाही. पण, जे काही गैरसमज होत आहेत, त्याचा परिणाम आमिर खानवर नाही, तर चित्रपटक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे हे लक्षात घ्या.’
'लायगर'चे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा: