Billboard Music Awards 2023: टेलर स्विफ्टनं 10 तर मॉर्गन वालेननं 11 पुरस्कारांवर कोरलं नाव! वाचा Billboard Music Awards च्या विजेत्यांची संपूर्ण यादी
Billboard Music Awards 2023: . बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2023 हा सोहळा काल पार पडला. हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट आणि मॉर्गन वॉलन यांनी अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले.
![Billboard Music Awards 2023: टेलर स्विफ्टनं 10 तर मॉर्गन वालेननं 11 पुरस्कारांवर कोरलं नाव! वाचा Billboard Music Awards च्या विजेत्यांची संपूर्ण यादी Billboard Music Awards 2023 winners full list Taylor Swift Drake Morgan Wallen and more Billboard Music Awards 2023: टेलर स्विफ्टनं 10 तर मॉर्गन वालेननं 11 पुरस्कारांवर कोरलं नाव! वाचा Billboard Music Awards च्या विजेत्यांची संपूर्ण यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/a04e10e51a75e941d9c4df9379e2875f1700479583941259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Billboard Music Awards 2023: बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स (Billboard Music Awards 2023) हा संगीत क्षेत्रातील सर्वात महत्वाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1990 मध्ये झाली. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. बिलबोर्ड संगीत म्युझिक अवॉर्ड्स 2023 हा सोहळा काल पार पडला. ज्यामध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट आणि मॉर्गन वॉलन यांनी अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. जाणून घेऊयात बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2023 च्या विजेत्यांची यादी
टेलर स्विफ्टला बिलबोर्ड संगीत पुरस्कार 2023 मध्ये 10 पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. तर मॉर्गन वालेननं 11 पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी-
टॉप आर्टिस्टचा पुरस्कार- टेलर स्विफ्ट
टॉप न्यू आर्टिस्ट - झॅक ब्रायन
टॉप मेल आर्टिस्ट - मॉर्गन वॉलन
टॉप फीमेल आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप ड्यू/ग्रुप- Fuerza Regida
टॉप बिलबोर्ड 200 आर्टिस्ट - टेलर स्विफ्ट
टॉप हॉट 100 आर्टिस्ट- मॉर्गन वॉलन
टॉप हॉट 100 सॉन्ग राइटर (न्यू)- टेलर स्विफ्ट
टॉप हॉट 100 प्रोड्यूसर (न्यू)- जॉय मोई
टॉप स्ट्रीमिंग साँग आर्टिस्ट- मॉर्गन वॉलन
टॉप रेडियो साँग आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप सॉन्ग सेल्स आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप बिलबोर्ड ग्लोबल 200 आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप बिलबोर्ड ग्लोबल(एक्सल.यू.एस) आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप आर अँड बी आर्टिस्ट- एसजेडए
टॉप आर अँड बी मेल आर्टिस्ट- द वीकेंड
टॉप आर अँड बी फीमेल आर्टिस्ट- एसजेडए
टॉप आर अँड बी टूरिंग आर्टिस्ट- बियोंसे
टॉप रॅप आर्टिस्ट- ड्रेक
टॉप रॅप मेल आर्टिस्ट- ड्रेक
टॉप रॅप फीमेल आर्टिस्ट- निक्की मिनाज
टॉप रॅप टूरिंग आर्टिस्ट- ड्रेक
टॉप कंट्री आर्टिस्ट- मॉर्गन वॉलन
टॉप कंट्री मेल आर्टिस्ट- मॉर्गन वॉलन
टॉप कंट्री फिमेल आर्टिस्ट- टेलर स्विफ्ट
टॉप कंट्री ड्यू/ ग्रुप- जॅक ब्राउन बँड
टॉप कंट्री टूरिंग आर्टिस्ट- मॉर्गन वॉलन
टॉप रॉक आर्टिस्ट- जॅक ब्रायन
TEN #BBMAs WINS for @taylorswift13 including ❤️ TOP ARTIST 💛 Congratulations!
— Billboard Music Awards (@BBMAs) November 20, 2023
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 pic.twitter.com/pdcnIIkHPX
बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स इव्हेंटमध्ये वॉलन यांना वन थिंग अॅट अ टाइमसाठी टॉप बिलबोर्ड 200 अल्बमचा पुरस्कार देण्यात आला. तर कॅरी यांना ख्रिसमस इज यू साठी ऑल आय वॉन्टसाठी विशेष अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॉर्गन वॉलनने बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्समध्ये 11 पुरस्कार जिंकले आहेत. बियॉन्से आणि मायली यांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 3-3 बिलबोर्ड पुरस्कार जिंकले तर झॅक ब्रायन यांना टॉप न्यू आर्टिस्टसह 4 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)