Shehnaaz Gill Net Worth : फक्त दोन बॉलिवूड चित्रपटात केलंय काम, तरीही कमाई आहे कोटींच्या घरात!
Shehnaaz Gill Net Worth : शहनाज गिल ही पंजाबी इंडस्ट्रीमधील स्टार अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत दोन बॉलिवूडपटात काम केले आहे.

Shehnaaz Gill Net Worth : बॉलिवूडमध्ये काही कलाकारांची इनिंग ही मोजक्याच चित्रपटांसाठी असते. मात्र, इतर सिनेसृष्टीत, छोट्या पडद्यावर हे कलाकार आपली छाप सोडत असतात. अभिनेत्री शहनाज गिलला (Shehnaaz Gill) बिग बॉस-13 मधून प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली. शहनाज गिल ही पंजाबी इंडस्ट्रीमधील मोठी अभिनेत्री आहे. तिने सत श्री अकाल इंग्लंड ( Sat Shri Akaal England), काला शाह काला, डाका, हौसला राख सारखे पंजाबी चित्रपट केले आहेत.
शहनाजने आतापर्यंत दोन बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. तिने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. यानंतर शहनाज गिल थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली. आता ती 'फर्स्ट क्लास'मध्ये दिसणार आहे.
शहनाजची संपत्ती किती?
MensXP च्या 2023 मधील एका वृत्तानुसार, शहनाज गिलची एकूण संपत्ती ही 33 कोटी रुपये आहे. वार्षिक उत्पन्न हे तीन कोटींच्या घरात असून मासिक उत्पन्न 25 लाख रुपये आहे. 2020 मध्ये तिची एकूण संपत्ती ही 8 कोटी आणि 2021 मध्ये 16 कोटी आणि 2022 मध्ये 29 कोटी इतकी होती.
View this post on Instagram
शहनाज ही ब्रँड एन्डोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. सोशल मीडियाच्या एका पोस्टसाठी ती 10 लाख रुपयांचे मानधन घेते. तर, युट्युबवरही तिचे एक चॅनेल आहे. शहनाजने मुंबईत एक आलिशान अपार्टमेंटही खरेदी केले आहे. शहनाजला लक्झरी कारची आवड आहे. तिच्याजवळ ऑडी 4, होंडा सिटी, रेंज रोव्हर इवोक, जग्वार एक्सजे अशा लक्झरी कार आहेत.
अशी झाली करिअरची सुरुवात
शहनाज गिलने 2015 मध्ये म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये झळकली होती. त्यानंतर तिला पंजाबी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये तिने बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या शोने त्याचे नशीब बदलले. या शोमध्ये तिची सिद्धार्थ शुक्लासोबतची जोडी चांगलीच जमली होती. शो सोडल्यानंतर ती आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. ती आपल्या फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते. बिग बॉस सोडल्यानंतर त्याने बरेच वजन कमी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
