Bigg Boss 17 : विदेशी पाहुण्याचा 'बिग बॉस 17'चा प्रवास संपला; अभिषेक कुमार अन् अंकिता लोखंडेला अश्रू अनावर
Bigg Boss 17 : नावेद सोलचा (Navid Sole) 'बिग बॉस 17'चा प्रवास संपला आहे. नाविद सोल बाहेर पडल्यानंतर अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) अश्रू अनावर झाले होते.
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. आता या पर्वातील नावेद सोलचा (Navid Sole) प्रवास संपला आहे. नाविद सोल बाहेर पडल्यानंतर अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) अश्रू अनावर झाले होते.
'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या आठवड्यात मीड विक एविक्शन झाल्याने घरातील स्पर्धक हैराण झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात एक-दोन नव्हे तर पाच स्पर्धक 'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडणार आहेत. पण काही स्पर्धकांची वाइल्डकार्ड एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस 17'च्या घरातील नावेद सोलचा प्रवास संपल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले. खानजादीलादेखील खूप वाईट वाटलं. दरम्यान अभिषेक नावेदला आपली हूडी भेट म्हणून देतो आणि बाहेर भेटण्यास सांगतो.
नावेदच्या मते अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'ची विजेती
'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर नावेद म्हणाला,"मला हिंदी येत नसल्याने माझ्यावर निशाणा साधण्यात आला. मी खूप चांगलं खेळत होतो. गेल्या सहा आठवड्यात मला अनेक गोष्टी शिकता आल्या. मी स्वत:ला विजेत्याच्या जागी पाहत होतो. भाषेमुळे नॉमेनेट करणं चुकीचं आहे. बिग बॉस दुसरी संधी देतील अशी आशा आहे. माझ्यामते अंकिता लोखंडे या पर्वाची विजेता व्हावी".
नावेद सोलबद्दल जाणून घ्या... (Who is Naved Sole)
नावेद हा लंडनचा रहिवासी असून तो अर्धा पर्शयन आणि अर्धा इटालियन आहे. त्याचा जन्म रोम येथे झाला आहे. नावेद सोल हा 29 वर्षांचा असून लंडन येथील महाविद्यालयातून त्याने फार्मसीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. नावेद हा लोकप्रिय कलाकार आहे. 'रिच किड्स गो स्किंट','बीबीसी इटिंग विथ माय एक्स सीझन 2','आयटीव्ही जज रिंडर सीझन 7' आणि 'मनोतो' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये नावेदने काम केलं आहे.
नावेद सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून अनेक मजेशीर व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नावेदचे इंस्टाग्रामवर 91.5 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. नावेदला हिंदी भाषा येत नाही आणि बिग बॉसच्या घरात इंग्रजी भाषेतून संवाद साधायला परवानगी नाही. त्यामुळे आता तो 'बिग बॉस'चा खेळ कसा खेळणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या