Bigg Boss 14 | बिग बॉसफेम सारा गुरपालची 'सुपारी' फुटली!
बिग बॉस 14 व्या सीझन मधील स्पर्धक सारा गुरपाल हिने आपण अविवाहित असल्याचे सांगितले होते. मात्र, एका पंजाबी गायकाने आमचा विवाह 2014 मध्ये झाल्याचा दावा केला आहे.
अलिकडे सारा म्हटलं की सारा अली खानचीच चर्चा जोरावर असते. पण या बातमीतली सारा वेगळी आहे. ही आहे सारा गुरपाल. आता ही फार माहीत असयाचं कारण नाही. कारण, ती अशी अगदी वेलनोन वगैरे कुणी नाहीय. पण आता ती माहीत झाली आहे कारण, ती बिग बॉसच्या 14 व्या सीझनची स्पर्धक आहे.
सारा गुरपाल ही पंजाबी सिनेसृष्टीतली स्टार आहे. तिथली ती गायिकाही आहे. सोशल मीडियावर ती सॉलिड कार्यरत असते. दिसायलाही ती नेटकी असल्यामुळे तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. तर अशा साराला बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये घेण्यात आलं आहे. या सीझनचा प्रिमिअरही झाला. त्यावेळी तिने आपण सिंगल असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन दिवस गेल्यानंतर साराचा पती सापडला आहे. अभिनेत्री साराही सिंगल नसून आपण तिच्याशी 2014 मध्येच लग्न केलं होतं असा दावा हा इसम करतो. गंमत अशी की हा पंजाबी गायक आहे. याचं नाव आहे तुषार कुमार.
Bigg Boss 14: सुखविंदर कौर ते राधे मां... असा आहे राधे मां बनण्याचा प्रवास
सारा आपली पत्नी असून आमचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. असं सांगतानाच त्याने विवाह केल्याचा दाखलाही सादर केला आहे. काही फोटोही दिले आहेत. या दाखल्यात मात्र साराचं नाव सारा गुरमित नसून रचना देवी असं आहे. तुषारने काही फोटोही सादर केले आहेत, यात सारा तुषारसोबत असून तिने कुंकू लावलं आहे. याबद्दल तुषार म्हणाला, 'आमचं लग्न 2014 च्या ऑगस्टमध्ये झालं. जालंधरमध्ये आम्ही लग्न केलं. साराने बिग बॉसच्या शोमध्ये आपण सिंगल असल्याचं सांगणं हे खोटं असून, मला जगभरातून फोन मेसेज आल्यानं मी आता त्याचं स्पष्टीकरण देतो आहे'
सारा गुरपालने बिग बॉसमध्ये आल्यापासून घरातलं वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. तिच्यासह जास्मिन भसीन, निक्की तांबोली यांनीही बिग बॉसच्या घराचा ताबा तर घेतला आहेच. शिवाय हा शो प्रेक्षणीय करायला सुरूवात केली आहे. तुषार कुमारचं आता स्पष्टीकरण देणं आणि साराचं आपण सिंगल आहोत असं सांगणं हे दोन्ही स्टंट आहेत असंही अनेक नेटिझन्सचं म्हणणं आहे.
Param Bir Singh PC | SSR Suicide Case | मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : परमबीर सिंग