BB 14 Winner Prize Money: 'बिग बॉस 14' च्या विजेत्याला मिळणार ट्रॉफीसह इतकी रक्कम
Bigg Boss 14 Winner Prize Money: आज संध्याकाळी बिग बॉसचा विजेता कोण होणाप यावरचा पडदा उघडणार आहे. विजेत्याला ट्रॉफीसह रोख रक्कम मिळणार आहे.
मुंबई : ‘बिग बॉस 14’ चं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आज रविवारी बिग बॉसचा ग्रॅन्ड फिनाले पार पडणार आहे. रुबिना दिलाईक, निक्की तांबोळी, अली गोनी, राखी सावंत आणि राहुल वैद्य हे पाच जण फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
बिग बॉसचे या पर्वाचा विजेता कोण हे प्रेक्षक ठरवणार आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी वूट अॅप किंवा वेबसाइटच्या आणि माय जियो या अॅपच्या माध्यमातून व्होटिंग करु शकता. ही व्होटिंग लाईन रविवार दुपारी 12 पर्यंत सुरु राहणार आहे.
बिग बॉसच्या विजेत्याला नेहमीप्रमाणे 50 लाखांचे बक्षिस जाहीर केलं जातं. पण या वर्षी तेवढीच रक्कम मिळणार की त्यापेक्षा कमी किंवा जास्त याची स्पष्टता नाही. यामधील एका एपिसोडच्या दरम्यान एटीएम टास्क मध्ये राखी सावंतने स्वत: नॉमिनेशन पासून वाचवण्यासाठी प्राईज मनी मधील 14 लाख रुपये पणाला लावले होते. त्यामुळे विनिंग अमाऊंटमधील 14 लाख रुपये कमी झाले आहेत.
असं असलं तरी या घरात असलेल्या लोकांना एक टास्क पूर्ण करावं लागणार आहे. पण विजेत्याला पूर्ण म्हणजे 50 लाख रुपये देण्यात येतील असंही काही जणांनी सांगितलंय. त्यामुळे ही पूर्ण रक्कम मिळाली तरी त्यावर केंद्र सरकारचा 10 टक्के जीएसटी लागणार असून विजेत्याला हातात 45 लाख रुपये मिळतील.
बिग बॉस 14 मध्ये आता केवळ पाच कंटेस्टंट्स रुबीना दिलाईक, राहुल वैद्य, अली गोनी, निक्की तांबोळी आणि राखी सावंत राहिले आहेत. यापैकी सर्वाधिक फी घेणारा कंटेस्टंट्स अली गोनी आहे. तो प्रति आठवडा प्रत्येकी 14 लाख रुपये घेत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रुबीना दिलायक आहे. जी प्रती आठवडा पाच लाख रुपये घेते. राहुल वैद्य प्रती आठवडा 1 लाख रुपये, निक्की तांबोळी प्रती आठवडा 1.2 लाख रुपये आणि राखी सावंत प्रती आठवडा अडीच लाख रुपये घेते.
सर्वाधिक फी घेणाऱ्या लोकांमध्ये अली गोनी सर्वात पुढे आहे. परंतु, या स्पर्धकांमध्ये सर्वात श्रीमंत एकच स्पर्धक आहे. ती म्हणजे, राखी सावंत. तिने शोमध्ये चॅलेंजर म्हणून एन्ट्री घेतली होती. तेव्हापासून तिने प्रेक्षकांचं खूप मनोरंज केलं आहे. राख घरातील सर्वात श्रीमंत स्पर्धकांपैकी एक आहे. तिच्याकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Bigg Boss 14 Finale : कोण होणार बिग बॉस 14 चा विजेता, उत्सुकता शिगेला, 'हे' आहेत अंतिम पाच स्पर्धक