एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 बाबत मोठी अपडेट, दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर होणार धमाका

Bhool Bhulaiyaa 3 Teaser : कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Release Date : अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी 'भूल भुलैया 3' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन याने चित्रपटाची टीझर आणि रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे.

कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 बाबत मोठी अपडेट

कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट भूल भुलैया 3 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी एकत्र झळकणार आहेत. या चिचत्रपटाच्या टीझरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता कार्तिक आर्यन याने भुल भुलैया चित्रपटाच्या टीझरबाबत मोठा खुलासा केला आहे. कार्तिक आयर्नने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर करत सांगितलं आहे की, लवकरच या चित्रपटाची टीझर लाँच करण्यात येणार आहे. 

दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर होणार धमाका

अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया 2' 2022 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'भूल भुलैया 3'ची मागणी होती. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाबद्दल बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, "भूल भुलैया 3 चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने यासाठी मी खूप उत्साही आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

टीझर आणि ट्रेलरवर मोठी अपडेट

नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेता कार्तिक आर्यनने भूल भुलैया 3 चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन जवळजवळ पूर्ण झाल्याचं त्याने सांगितलं आहे. टीझर पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, असंही त्याने सांगितलं. कार्तिक म्हणाला, "काही दिवसांत चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला येईल. चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होत आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. टीझर खूप छान बनवला आहे".

चित्रपटाची तयारी पूर्ण, टीमचा उत्साह शिगेला

कार्तिक आर्यनने पुढे सांगितलं की, "संपूर्ण टीमने हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रत्येकजण याबद्दल खूप आनंदी आणि सकारात्मक आहे. चित्रपटाला फायनल टच देण्याचं काम सुरू असून लवकरच भूल भूलैया 3 चा टीझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांत तुम्हा सर्वांना चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी आणि नंतर चित्रपट पाहायला मिळणार आहे". कार्तिकच्या या अपडेटनंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rajkummar Rao Birthday : एकेकाळी पार्ले-जी खाऊन काढले दिवस, आज आहे कोट्यवधींची मालक; वाचा अभिनेता राजकुमार रावचा खडतर प्रवास

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget