Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: माधुरी-विद्याच्या केमिस्ट्रीची जादू, कार्तिकसाठी दिवाळी ठरली आनंदाची; 'भूल भुलैया 3'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसला झपाटलं
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: भूल भुलैया 3 च्या कमाईचे आकडे समोर येताच कार्तिक आर्यनने अगदी वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.
![Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: माधुरी-विद्याच्या केमिस्ट्रीची जादू, कार्तिकसाठी दिवाळी ठरली आनंदाची; 'भूल भुलैया 3'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसला झपाटलं Bhool Bhulaiyaa 3 opening day Box Office Collection Kartik Aryan Vidya Balan Madhuri Dixit Bollywood Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: माधुरी-विद्याच्या केमिस्ट्रीची जादू, कार्तिकसाठी दिवाळी ठरली आनंदाची; 'भूल भुलैया 3'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसला झपाटलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/02/4774396cfc2a7215e88e8599b83b43a01730563038501720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' (Singham Again) या मल्टीस्टारर चित्रपटाशी टक्कर होऊनही चित्रपटाने दमदार ओपनिंग केलीये. यानंतर कार्तिक आर्यनचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच या सिनेमात विद्या बालन (Vidya Balan) आणि माधुरीची (Madhuri Dixit) कमेस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.
कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचे ओपनिंग डेचे अधिकृत आकडे समोर आले आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी या सिनेमा जवळपास 36.6 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सिंघम अगेनसोबत सिनेमागृहामध्ये दाखल झालेल्या या सिनेमाने ओपनिंग डेला भरभरुन कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे.
कलेक्शननंतर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया
कार्तिक आर्यनने कमाईच्या आकड्यांशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे.पोस्टच्या कॅप्शनमध्ये कार्तिक आर्यनने लिहिले आहे की, "माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवाळी, मी आणि माझी मंजू (मंजुलिका) पैसे मोजण्यासाठी जातोय...प्रेक्षकांचे आभार कारण त्यांनी या चित्रपटाला माझ्या करिअरची सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे.
सिंघम अगेन vs भूल भुलैया 3
कार्तिकच्या चित्रपटासोबत सिंघम अगेन प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे नुकसान होऊ शकते, असं म्हटलं जात होतं. स्क्रीन शेअरच्या बाबतीतही या चित्रपटाला आधीच नुकसान सोसावे लागले होते. सिंघमच्या तुलनेत या सिनेमाला 25 टक्के कमी स्क्रीन मिळाले आहेत.असे असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36 कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजिबात मागे पडणार नाही, हे या सिनेमाने दाखवून दिलंय.
'भूल भुलैया 3' सिनेमाविषयी...
2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैया सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या दोन मंजुलिकाच्या भूमिकेत दिसत आहेत. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात कार्तिकशिवाय तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव-संजय मिश्रासारखे कलाकारही आहेत. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी चांगली कामगिरी करेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)