Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया 3' चित्रपटाची शूटिंग 'या' दिवशी होणार पूर्ण; टीझर रिलीजबाबत मोठी अपडेट समोर
Kartik Aryan Bhool Bhulaiyaa 3 Update : भूल भुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपटाचं शूटींग सुरु असून लवकरच हा चित्रपट चाहत्यांचा भेटीला येणार आहे.
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) बहुप्रतिक्षित 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3 Movie) चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भूल भुलैया चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2007 मध्ये आलेला'भूल भुलैया' आणि त्यानंतर 2022 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया 2' या हिट चित्रपटांनंतर आता 2024 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर भूल भुलैया 3 चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
'भूल भुलैया 3' चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर
भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यनसह तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. येत्या 2 ऑगस्टला या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. दरम्यान, त्याच्या टीझर रिलीजबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.
'भूल भुलैया 3' चित्रपटाची शूटिंग 'या' दिवशी होणार पूर्ण
अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासह मोठी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. या बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटात राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहेत. मार्चपासून चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली. टीम गेल्या चार महिन्यांपासून सतत काम करत आहे.
टीझर रिलीजबाबत मोठी अपडेट समोर
दरम्यान, एका मीडिया रिपोर्टनुसार सूत्राच्या हवाल्याने समोर आलं आहे की, सुमारे 75 दिवसांचा प्रवासानंतर 2 ऑगस्टला शूटिंग संपणार आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट सध्या शूटिंग करत आहे. चित्रपटाचे निर्माते दिवाळीमध्ये रिलीजआधी मार्केटिंगची तयारी करत आहेत. ऑगस्टच्या मध्यापर्यंत चित्रपटाचा टीझर रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
View this post on Instagram
दिवाळीमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, 'दिवाळीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने सध्या टीझरवर काम सुरू आहे आणि मेकर्स ऑगस्ट महिन्यात टीझर रिलीज करण्याच्या विचारात आहेत. एडिटिंग आणि VFX वर काम सुरु आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :