Bharti Singh Haarsh Limbachiyaa : भारती आणि हर्षने दिली गुडन्यूज; नेमकं प्रकरण काय?
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांची झलक पाहायला मिळणार आहे.
Bharti Singh Haarsh Limbachiyaa Cameo In Rocky Aur Rani Ki Prem Kahani : विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) सध्या चर्चेत आहेत. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंह म्हणाली, "करण जोहरच्या (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात मी आणि माझा पती हर्ष लिंबाचियाची झलक पाहायला मिळणार आहे. करण जोहरने या सिनेमासाठी आम्हाला विचारणा केली तेव्हा लगेचच या सिनेमासाठी आम्ही दोघांनीही होकार दिला. करण जोहरसोबत काम करतानाचा अनुभव खूपच चांगला होता. शूटिंगदरम्यान आम्ही सर्वांनी खूप मजा केली."
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या रोमॅंटिक सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात रणवीर सिंह (Ranveer Singh) रॉकी खतुरियाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट (Alia Bhatt) रानी चॅटर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' कधी प्रदर्शित होणार? (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date)
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून करण जौहर (Karan Johar) अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. आलिया-रणवीरसह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, तोता रॉय चौधरी आणि सास्वता चटर्जीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच भारती-हर्षप्रमाणे श्रद्धा आर्या आणि अर्जुन बिजलानी झलकदेखील प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर आमने-सामने
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे आता कोणत्या सिनेमाचा प्रेक्षक पसंती दर्शवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच दोन्ही सिनेमांच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या