Bali : 'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' (Bali) या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला  दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) मुख्य भूमिकेत आहे. 


चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी 'बळी' या सिनेमात श्रीकांतच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा स्वप्नील जोशी म्हणजेच श्रीकांतच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना हॉरर आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे. विशाल फुरियाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 






'बळी' या सिनेमामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची निर्मिती अर्जुन सिंह बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी केली आहे. 


संबंधित बातम्या


Stepney : 'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; भरत जाधव विनोदी भूमिकेत


Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


Jhimma : 'झिम्मा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 27 तारखेला टीव्हीवर दिसणार