Karkhanisanchi Waari : 'पावनखिंड', 'झिम्मा' नंतर आता एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी' (Karkhanisanchi Waari) या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 3 जुलैला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
तगडी स्टार कास्ट असलेला 'कारखानीसांची वारी'
'कारखानीसांची वारी' या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मंगेश जोशी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'कारखानीसांची वारी' या सिनेमात मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे. एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्याचं काम या सिनेमाने केलं आहे.
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवलेला सिनेमा!
'कारखानीसांची वारी' या सिनेमाने इफ्फी, टोकियो फिल्म फेस्टिव्हलसारखे अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवले आहेत. 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच 'मटा सन्मान 2022' मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचे नामांकन मिळाले होते. तसेच कान्स या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील या सिनेमाचा सहभाग होता.
'कारखानीसांची वारी' या सिनेमात प्रेक्षकांना एका अनोख्या वारीचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. कारखानीस अडनाव असलेल्या एका कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमातील गाणी आणि संगीत प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांना येत्या रविवारी घरबसल्या पाहता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम आदी तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन 'कारखानीसांची वारी' या सिनेमाची कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी निवड केली होती.
संबंधित बातम्या