Mangesh Desai : अभिनेता, निर्माता मंगेश देसाई (Mangesh Desai) गेल्या अनेक दिवसांपासून 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता मंगेश देसाई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. कर्जतला जात असताना मंगेशच्या कारला अपघात झाला आहे. 


गाडीचे नुकसान


मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीचे नुकसान झाल्याने मंगेश देसाईला आर्थिक फटका बसला आहे. मंगेश देसाई म्हणाला, मला आणि कुटुंबाला कोणतीही दुखापत झालेली नाही. गाडीचे थोडे नुकसान झाले आहे. छोटासा अपघात झाल्याने काळजी करण्याचे कारण नाही". 


नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. यासाठी मंगेश देसाईनेच पुढाकार घेतला होता. यामुळे मंगेशच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडलं होतं. 


मंगेश देसाईंची मुख्यमंत्र्यांसाठीची पोस्ट व्हायरल


‘धर्मवीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी एक आठवण शेअर केली होती. त्यांनी लिहिलेले की, ‘वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो 2007 साली. तुम्ही आमदार होतात त्या वेळी. तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिझिटींग कार्ड द्यायला लावलत आणि काहीही मदत लागली तर सांगा असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीतही आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात, हे कशाला ?आपण मित्र आहोत मंगेश आणि खरंच मित्र झालात’.


संबंधित बातम्या


मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार!


Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा; सिनेमाच्या टीमने मानले आभार