एक्स्प्लोर

'बाला' चित्रपट कथाचोरी प्रकरणी अभिनेता आयुषमान खुरानाला समन्स

'बाला' चित्रपटाची कथा मूळ आपली असल्याचं सांगत सहाय्यक दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी अभिनेता आयुषमान खुराणासह 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांच्याविरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानावर कथाचोरीचा आरोप करण्यात आला आहे. 'बाला' चित्रपटाची कथा चोरल्याची तक्रार करत कमल चंद्रा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रकरण कोर्टात असतानाही सिनेमाचं शूटिंग सुरु केल्यामुळे मुंबईजवळच्या काशीमीरा पोलिसांनी आयुषमानला पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. आयुषमान पोलिस स्टेशनमध्ये हजर न राहिल्यास त्याला आरोपी ठरवून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट उल्लेख समन्समध्ये करण्यात आला आहे. वारंवार फोन आणि मेसेज करुनही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आयुषमानला दिले आहेत. आयुषमान खुराणासह 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांच्याविरोधात बॉम्बे हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणी पूर्ण होण्याआधीच  'बाला' चित्रपटाचं शूटिंग सुरु केल्यामुळे कमल चंद्रा यांनी आयुषमान आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात 29 मे रोजी काशीमीरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. VIDEO | खासदार डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर व्हॉट्सअॅपवर आपण दीड पानी मूळ कथा आयुषमानला पाठवली होती. गोष्ट आवडल्याचं सांगत आयुषमानने आपल्याला भेटीची वेळ दिली. मात्र ऐनवेळी भेट नाकारत आयुषमानने पुन्हा कधीच संपर्क साधला नाही, असा दावा कमल चंद्रा यांनी याचिकेत केला होता. आयुषमानच्या टीमकडून ही कथा पूर्णपणे आपल्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'बाला' चित्रपटाच्या शूटिंगला 6 मेपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये आयुषमान एका केसगळतीने त्रस्त तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget