एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चं नाव होतं 'मंगळागौर'; केदार शिंदेंचा 'माझा कट्ट्या'वर खुलासा

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'च्या टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. दरम्यान या सिनेमाच्या भारी टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. 'बाईपण भारी देवा'चं नाव 'मंगळागौर' असल्याचा खुलासा दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी माझा कट्ट्यावर केला आहे.

'बाईपण भारी देवा'चं नाव होतं 'मंगळागौर'; केदार शिंदेंचा माझा कट्ट्यावर खुलासा

केदार शिंदे म्हणाले,"बाईपण भारी देवा' या सिनेमाचं नाव आधी 'मंगळागौर' होतं. सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान या 'बाईपण भारी देवा' हे गाणं तयार झालं होतं. त्यावेळी अजित भुरेने गाण्यातीलच 'बाईपण भारी देवा' या कॅची ओळीवर सिनेमाचं नाव ठेवण्याचं सुचवलं. 

केदार शिंदेंनी 'बाईपण भारी देवा' करण्याचं का ठरवलं? 

केदार शिंदे म्हणाले,"वैशाली नाईकने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं लेखन केलं आहे. तिने मला या सिनेमाची वन लाईन ऐकवली तेव्हाच माझ्या मनात विचार आला की, हा सिनेमा पाहायला मी तिकीट काढून जाईल. 'बाईपण भारी देवा'ची संहिता मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा या सहा व्यक्तिरेखांच्या भूमिकेत मला याच सहा अभिनेत्री दिसल्या होत्या. या सहा अभिनेत्रींनी लगेचच सिनेमासाठी मला होकार दिला. या अभिनेत्रींसोबत पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने मी एकत्र काम केलं आहे. दीपाने याआधी माझ्या एका नाटकात काम केलं होतं". 

केदार शिंदे पुढे म्हणाले,"सहा अभिनेत्री एक उत्तम सहकलाकारदेखील आहेत. या सहा अभिनेत्री उत्कृष्ट दर्जाच्या आहेत हे सर्वसामान्य प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी हा सिनेमा यावा लागला हे दुर्देव आहे. सिनेमातल्या सहा अभिनेत्रींच्या मनात एकमेकींविषयी कोणतीही स्पर्धा नव्हती".

केदार शिंदेंनी सांगितला शूटिंगदरम्यानचा एक रंजक किस्सा

किस्सा शेअर करत केदार शिंदे म्हणाले,"मेकरुम ते सेट हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. व्हॅनिटी ट्रिपल डोअरची होती. पण या अभिनेत्रींनी मधले सर्व दरवाजे सुरू करुन ठेवले होते. त्यामुळे चाळीसारखं वातावरण सेटवर निर्माण झालं होतं.  माझी मुलगी सना ही या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शन करत होती. त्यावेळी पहिल्या दिवशी शॉट रेडी झाल्यावर ती वंदना गुप्तेंना बोलवायला गेली. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,"सांग तुझ्या बापाला येत नाही म्हणून". एकंदरीतच सेटवर गंमतीशीर वातावरण होतं.  

'बाईपण भारी देवा'च्या टीमसोबत रंगणार माझा कट्टा

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या टीमसोबत आजचा माझा कट्टा रंगणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या शूटिंगदरम्यानचे रंजक किस्से दिग्दर्शक केदार शिंदेसह अभिनेत्री वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांनी माझा कट्ट्यावर शेअर केले आहेत. हा विशेष कट्टा प्रेक्षकांना आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे. 

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sachin Pilgaonkar: ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget