Jwala Gutta Weds Vishnu Vishal: बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अभिनेता विष्णू विशाल विवाहबद्ध, पाहा लग्नाचे फोटो
ज्वाला आणि विष्णू गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या नात्याविषयी सर्वांना माहिती दिली.

Jwala Gutta Weds Actor Vishnu Vishal : भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwalal Gutta) आणि दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) यांचा विवाह सोहळा गुरुवारी (22 एप्रिल) पार पडला. हैदराबादमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
View this post on Instagram
ज्वाला गुट्टा आणि विष्णू विशाल दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. फोटोंमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. ज्वाला आणि विष्णू गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या नात्याविषयी सर्वांना माहिती दिली.
View this post on Instagram
ज्वाला आणि विष्णू दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी ज्वालाने शटलर चेतन आनंदशी लग्न केले होते. 2011 साली या दोघांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, विष्णू विशालने 2010 मध्ये फिल्म निर्माता रागिनी नटराजसोबत पहिले लग्न केले. पण 2018 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विष्णू आणि रागिनी यांचा एक मुलगा देखील आहे.
View this post on Instagram
गेल्या दोन दिवसांपासून ज्वालाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामध्ये मेहंदी, हळदीचे समारंभाच्या फोटोचा समावेश आहे. या महिन्याच्या सुरुवातीला विष्णू आणि ज्वाला यांनी सोशल मीडियावर लग्नाची तारीख जाहीर केली होती.
View this post on Instagram























