Border 2 : सनी देओलच्या 'बॉर्डर 2'मध्ये आयुष्मान खुरानाची एन्ट्री! चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली
Sunny Deol Film Border Update : सनी देओलच्या 'बॉर्डर 2' (Gadar 2) या सिनेमात आयुष्मान खुरानाची (Ayushmann Khurrana) एन्टी होणार आहे.
Sunny Deol Movie Border 2 Latest Update : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं आहे. सनीच्या 'गदर 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. 'गदर 2' या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. अशातच आता तो 'बॉर्डर 2' (Border 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'बॉर्डर 2' या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. या सिनेमात आयुष्यमान खुरानाची (Ayushmann Khurrana) एन्ट्री होणार आहे.
'गदर 2' सुपरहिट झाल्यानंतर अनेक चांगल्या सिनेमांसाठी सनी देओलला विचारणा झाली. तसेच त्याच्या आगामी सिनेमासंदर्भात अपडेट्स यायला सुरुवात झाली. पण आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सनीच्या 'बॉर्डर' या सिनेमाच्या सीक्वेलसंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.
'बॉर्डर 2'चं दिग्दर्शन कोण करणार?
सनी देओलचा 'बॉर्डर 2' (Border 2) हा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या चर्चा सुरू झाल्या. भूषण कुमार आणि जेपी दत्ता या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांनी 'बॉर्डर 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी अनुराग सिंह यांना विचारणा केली आहे.
View this post on Instagram
अनुराग सिंह यांनी 'केसरी' आणि 'पंजाब 1984' सारख्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'बॉर्डर 2' या सिनेमात आयुष्मान खुराना झळकणार असल्याचंही समोर आलं आहे. सनी देओलने अद्याप या सिनेमासाठी साइन केलेलं नसून तो यासंदरर्भात विचार करत आहे.
'बॉर्डर'ला प्रेक्षकांची पसंती
'बॉर्डर' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 2024 मध्ये 'बॉर्डर 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे म्हटले जात आहे. 'बॉर्डर' हा सिनेमा 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जेपी दत्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सनी देओलसह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पूजा भट्ट आणि तब्बू हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धावर आधारित 'बॉर्डर' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
संबंधित बातम्या