Avatar The Way Of Water : निळ्या विश्वाची जादू आता घरबसल्या पाहा; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर होणार रिलीज
Avatar 2 : 'अवतार 2' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Avatar The Way Of Water : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज आहे. त्यामुळे निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. पण भारतीय सिनेप्रेक्षकांना मात्र घरबसल्या हा सिनेमा पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'अवतार 2' (Avatar 2) हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा भावला. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता जेम्स कॅमेरॉन (James Cameron) दिग्दर्शित हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
James Cameron's #AvatarTheWayOfWater will be available on Digital for overseas audiences from March 28th. pic.twitter.com/gHLzRvMqwC
— Streaming Updates (@OTTSandeep) March 7, 2023
Return to Pandora whenever you want at home, only on Digital March 28. Get access to over three hours of never-before-seen extras when you add #AvatarTheWayOfWater to your movie collection. pic.twitter.com/88NRm5vKJC
— 20th Century Studios (@20thcentury) March 7, 2023
'अवतार 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Avatar 2 Box Office Collection)
मीडिया रिपोर्टनुसार, 'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. या सिनेमाने 'अॅव्हेंजर्स एंडमेग' आणि 'टायटॅनिक' या बहुचर्चित सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. आजही जगभरात 'अवतार 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
'अवतार द वे ऑफ वॉटर' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ब्लू रे (Blu Ray) आणि डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. येत्या 28 मार्चपासून प्रेक्षकांना हा सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे. 'अवतार 2' सारखा सिनेमा आता घरबसल्या पाहायला चाहते उत्सुक आहेत.
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची नाळ एका अद्भुत दुनियेशी जोडली गेली आहे. समुद्र, समुद्रातील प्राणी त्यांच्यातील विविधता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी या सिनेमाने 20 हजार 268 कोटींचा गल्ला जमवला होता.
तगडी स्टारकास्ट असलेला 'अवतार द वे ऑफ वॉटर'
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमात सॅम वर्थिंग्टन (Sam Wothington), जो सलदाना (Zoe Saldana) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओहह आणि जेमेन क्लेमेंट हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या