Avatar 2 Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर'ची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या पाच दिवसांची कमाई...
Avatar 2 : 'अवतार 2' या सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशीपर्यंत 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Avatar The Way Of Water Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातील सिनेप्रेमींसह भारतीय सिनेरसिकांनादेखील हा सिनेमा आवडत आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीतदेखील हा सिनेमा आघाडीवर आहे. आज हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो.
'अवतार' (Avatar) हा सिनेमा 2009 साली जगभरात प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. आता तेरा वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पाण्याखालचं विश्व चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
'अवतार 2'ची पाच दिवसांची कमाई जाणून घ्या? (Avatar 2 Box Office Collection) :
ओपनिंग डेला 'अवतार 2' (Avatar 2) या सिनेमाने 40.3 कोटींची केली आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 46 कोटी, चौथ्या दिवशी 18.6 कोटी तर पाचव्या दिवशी 16 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 163.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस - 40.3 कोटी
- दुसरा दिवस - 42.5 कोटी
- तिसरा दिवस - 46 कोटी
- चौथा दिवस - 18.6 कोटी
- पाचवा दिवस - 16 कोटी
- एकूण - 163.40 कोटी
'अवतार 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आज किंवा उद्या या सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. तर रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडपर्यंत अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या