एक्स्प्लोर

Athiya Shetty KL Rahul Wedding : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.

Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार शाही विवाहसोहळा

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा शाही विवाहसोहळा 21 ते 23 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. लवकरच ते लग्नपत्रिकांचं वाटप करायला सुरुवात करणार आहेत. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं असल्याने आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. पण अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे संगीत, मेहंदी, हळद असे सर्व कार्यक्रम होणार आहेत. दाक्षिणात्य रितीरिवाजानुसार ते लग्न करणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील 'जहान' बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी यांनी लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं. मीडियाला माहिती देताना ते म्हणाले होते,"लग्न लवकरच होणार आहे". 

अथिया-केएल घेणार ब्रेक!

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अथियाने 2015 साली 'हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आजवर अनेक सिनेमांत ती महत्तवाच्या भूमिकेत झळकली आहे. आता लग्नासाठी दोघेही आपापल्या कामांमधून खास ब्रेक घेणार आहेत. 

संबंधित बातम्या

Athiya Shetty And KL Rahul : 'लवकरच'; अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेवर सुनील शेट्टीनं सोडलं मौन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : स्वबळावर की महायुतीतून? भाजपच्या जिल्हाध्यक्षाला निर्णयाचा अधिकार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
स्वबळावर की महायुतीतून? भाजपच्या जिल्हाध्यक्षाला निर्णयाचा अधिकार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray vs Shinde: 'हेलिकॉप्टरने जाऊन भाजी कापतो की रेडा?', Uddhav Thackeray यांची टीका
Thackeray's Regret: 'अनंत तरेंनी इशारा दिला होता, पण ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय' - उद्धव ठाकरे
Ajit Pawar Satara: हर्षिता राजे इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीचं लोकार्पण,अजित पवारांचा सन्मान
Pune Passport Racket : BJP आमदार Siddharth Shirole यांचा गंभीर आरोप
Pune Crime Files: 'गुंड Sachin Gayawal मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर', Rohit Pawar यांचा थेट आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : स्वबळावर की महायुतीतून? भाजपच्या जिल्हाध्यक्षाला निर्णयाचा अधिकार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
स्वबळावर की महायुतीतून? भाजपच्या जिल्हाध्यक्षाला निर्णयाचा अधिकार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
Nobel Prize : डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
Kolhapur Fake Currency Gang: खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
Embed widget