एक्स्प्लोर

गायिका नाहिद आफरीनविरोधात 46 आसामी मुल्लांचा फतवा

गुवाहाटी : 'इंडियन आयडल ज्युनिअर' या सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा काढण्यात आला आहे. आयएस दहशतवादाच्या विरुद्ध आपल्या गाण्याच्या माध्यमातून एल्गार काढणाऱ्या नाहिदविरोधात 46 आसामी मुल्लांनी फतवा काढला आहे. 2015 मधील 'इंडियन आयडल ज्युनिअर'च्या पर्वात उपविजेत्या ठरलेल्या 16 वर्षांच्या नाहिदने नुकतंच एका जाहीर कार्यक्रमात आयएस विरोधात सूर आळवले. याचीच प्रतिक्रिया म्हणून हा फतवा काढला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. मध्य आसाममधील होजाई आणि नागाव जिल्ह्यात फतव्याची पत्रकं काढण्यात आली आहेत. काय आहे फतवा? '25 मार्चला आसामच्या लंका भागातील 'उदाली सोनाई बिबी कॉलेज'मध्ये नाहिद ही गायिका शरियाच्या विरोधात गाणं गाणार आहे. मस्जिद, इदगाह, मदरसे आणि स्मशानभूमीने वेढलेल्या कॉलेजच्या या मैदानात शरिया-विरोधी म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली तर आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या मनात अल्लाविषयी राग निर्माण होईल.' असं या फतव्यात म्हटलं आहे. 16 वर्षांची नाहिद आफरीन दहावीची विद्यार्थिनी असून आसामच्या बिश्वनाथ चरियाली भागात राहते. आपल्याविरोधात काढलेल्या फतव्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 'मी निशब्द झाली आहे. संगीत ही माझ्यासाठी देवाची देणगी आहे. त्यामुळे मी अशा धमक्यांना भीक घालणार नाही, त्याच्यापुढे झुकणार नाही. माझं गाणं कधीच सोडणार नाही.' असं नाहिद म्हणते. कार्यक्रमाच्या आयोजकांनीही मैफल रद्द करण्यास नकार दिल्याचं नाहिदच्या आईने सांगितलं आहे. नाहिद आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे. 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या 'अकिरा' चित्रपटासाठी पार्श्वगायन करुन तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget