गजनी फेम असिनचा घटस्फोट? सोशल मीडियावरील राहुल शर्मासोबतचे फोटो हटवल्यामुळे चर्चेला उधाण, अभिनेत्रीनं सांगितलं सत्य
सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसलेल्या असिनने (Asin) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो हटवल्याले आहेत.

Asin Thottumkal Deleted Husband Pics: अभिनेत्री असिन (Asin) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. असिननं पती राहुल शर्मासोबत घटस्फोट घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसलेल्या असिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो हटवल्याले आहेत. त्यामुळे असिन आणि राहुल हे दोघे विभक्त झाले आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
असिनने राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. त्याचवेळी,आता असिन ही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पतीसोबतचे सर्व फोटो हटवल्यामुळे चर्चेत आहे.असिनने तिच्या लग्नाचे फोटो देखील इन्स्टाग्रामवरुन हटवले आहेत. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना ती घटस्फोट घेणार आहे का? असा प्रश्न पडला आहे.
असिननं शेअर केली पोस्ट
सोशल मीडियावर असिन आणि राहुल यांच्या घटस्फोटोची चर्चा होत असतानाच आता असिननं एक पोस्ट शेअर करुन हे सर्व खोटं असल्याचं सांगितलं आहे. असिननं पोस्टमध्ये लिहिलं, 'आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आम्ही एकमेकांच्या जवळ बसून नाश्त्याचा आस्वाद घेत होतो आणि काही अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे निराधार 'बातम्या' समोर आल्या आहे. या बातम्या बघून मला त्या दिवसांची आठवण आली जेव्हा, आम्ही आमच्या कुटुंबासह घरी बसून आमच्या लग्नाची बोलणी करत होतो आणि तेवढ्यात आमचं ब्रेकअप झालं आहे, अशी अफवा पसरली होती. (याविषयामुळे या अप्रतिम सुट्टीतील 5 मिनिटे वाया घालवल्यामुळे आम्ही निराश झालो आहोत) तुमचा दिवस चांगला जावो!'
अभिनेत्री असिनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे . असिनने 2001 मध्ये मल्याळम चित्रपट नरेंद्रन माकन जयकांथन वाकामधून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनली. त्यानंतर असिनने आमिर खानपासून सलमान खानपर्यंत अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. गजनी, रेडी या हिंदी चित्रपटामधील असिनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. असिननं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
