Asha Bhosle : मुसळधार पावसात आशा भोसलेंनी लाडक्या नातीसोबत घेतला जपानी भोजनाचा आनंद; व्हिडीओ व्हायरल
Asha Bhosle : आशा भोसले लाडक्या नाती सोबत जपानी भोजनाचा आनंद घेताना दिसून आल्या आहेत.
Asha Bhosle : लोकप्रिय गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आजही अनेक लहान-लहान गोष्टींत आनंद शोधतात. संगीतासोबतच त्यांना कुकिंगचीदेखील आवड आहे. जगभरात त्यांचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. आशा भोसले नुकत्याच त्यांची लाडकी नात जनाईसोबत (Zanai Bhosale) जपानी भोजनाचा आनंद घेताना दिसून आल्या आहेत.
आशा भोसले जनाईसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघींमध्ये छान मैत्रीचं नातं आहे. आशा भोसले अनेकदा जनाईसोबत त्यांच्या आवडत्या जपानी हॉटेलमध्ये जेवायला जात असतात. मुसळधार पावसात आशा भोसले आणि जनाई मुंबईतील वांद्रे येथील एका जपानी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आल्या आहेत.
View this post on Instagram
आशा भोसलेंना नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात. त्यामुळे त्या जनाईसोबत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायला जात असतात. आशा भोसलेंप्रमाणे जनाईलादेखील स्वयंपाकाची आवड आहे. आशा भोललेंना लता दीदींच्या हातचं कोथिंबीर मटण खायला प्रचंड आवडायचं. आशा भोसले आणि जनाई अनेकदा जेवणासाठी वांद्रे येथील मिझू रेस्टॉरंटमध्ये जात असतात.
आशा भोसलेंचे जगभरात रेस्टॉरंट
आशा भोसलेंचे जगभरात रेस्टॉरंट आहेत. दुबई आणि कुवेतमध्ये असलेल्या रेस्टॉरंटचे नाव 'आशाज' असं आहे. दुबई आणि कुवेतसह त्यांचे आबुधाबी, दोहा, बहरीनमध्येदेखील रेस्टॉरंट आहेत. आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ मिळतात. अनेकदा आशा भोसले स्वतः शेफना ट्रेनिंग देतात.
संबंधित बातम्या