Aryan Khan : आर्यन खानच्या 'Stardom'चा हिरो निश्चित! 800 ऑडिशन्सनंतर 'या' अभिनेत्याची निवड
Aryan Khan : आर्यन खानच्या आगामी 'स्टारडम' या वेबसीरिजमध्ये लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Aryan Khan Debut Web Series Stardom Update : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या त्याच्या 'स्टारडम' (Stardom) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंहची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार या सीरिजमधील हिरोच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
आर्यन खानच्या 'Stardom'चा हिरो निश्चित!
मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान सध्या 'स्टारडम' या सीरिजमुळे चर्चेत आहे. पहिलीच सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. आर्यनने तब्बल 800 ऑडिशन्सनंतर 'स्टारडम'चा हिरो निश्चित केला आहे. आर्यनच्या 'स्टारडम' या सीरिजमध्ये अभिनेता लक्ष्य लालवानी (Lakshya Lalwani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'स्टारडम' या वेबसीरिजच्या शूटिंगला या महिन्याच्या शेवटी सुरुवात होणार होती. पण काही कारणाने शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. आर्यन खान आपल्या वेबसीरिजमध्ये लोकप्रिय चेहऱ्यांपेक्षा नवोदित कलाकारांना संधी देत आहे. राम कपूर आणि गौतमी कपूर हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आर्यनने निवड केलेला लक्ष्य लालवानी कोण आहे? (Who Is Lakshya Lalwani)
लक्ष्य लालवानीने छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. त्याने 'प्यार तूने क्या किया','परदेश में है मेरा दिल','अधुरी कहानी हमारी' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच करण जोहरच्या 'दोस्ताना 2' या सिनेमांतदेखील लक्ष्य झळकला आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला.
View this post on Instagram
आर्यन खानची 'स्टारडम' ही पहिली सीरिज सहा भागांची असणार आहे. या सीरिजची घोषणा झाल्यापासून चाहते प्रतीक्षा करत आहेत. या वेबसीरिचं दिग्दर्शन करण्यासोबत आर्यनने या सीरिजच्या लेखनासाठी बिलालला मदत केली आहे. 2024 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.
आर्यनला आवडतं पडद्यामागचं जग
शाहरुखचा मुलगा आर्यन खान खूपच लोकप्रिय आहे. पण अभिनयापेक्षा त्याला पडद्यामागचं जग जास्त भावलं आहे. त्याने 'स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स' या महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शनची त्याला पदवी मिळाली आहे.
संबंधित बातम्या