एक्स्प्लोर

अनुष्काने झापलेला अरहान शाहरुखसोबत झळकला होता

अनुष्काने झापलेला अरहानचं बॉलिवूड कनेक्शन आता समोर आलं आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत अरहानने स्क्रीन शेअर केली आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशाला दम भरल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल झाल्यानंतर कचरा फेकणारा अरहान सिंह चर्चेत आला होता. मात्र अरहानचं बॉलिवूड कनेक्शन आता समोर आलं आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत अरहानने स्क्रीन शेअर केली आहे. अरहानने शाहरुख खानसोबत 'इंग्ल‍िश बाबू देसी मॅम' (1996) या सिनेमात शाहरुखच्या मुलाची भूमिका साकारली होती. किंग खानसोबतचा एक फोटो अरहानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, 'किती सुंदर होते ते दिवस.' अरहानने शाहिद कपूरसोबत 'पाठशाला' (2010) या सिनेमात काम केलं आहे. अरहान बॉलिवूडमध्ये सनी सिंह नावाने प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तो बॉलिवूडपासून लांब आहे. रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अरहान एका मॅनेजमेंट कंपनीचा मालक असून तो फॅशन डिझायनरही आहे. काय आहे प्रकरण ? गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका तरुणाला अनुष्काने चांगलंच खडसावलं होतं. दिल्लीतील रस्त्यावर घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ विराट कोहलीने ट्विटरवर शेअर केला होता. "कोणी रस्त्यावर कचरा टाकत असेल तर त्याचाही असाच व्हिडीओ बनवा, ज्यामुळे स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होईल," असंही विराट म्हणाला होता. विराटने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अरहानची फेसबुक पोस्ट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अरहाने फेसबुक पोस्ट लिहिली होती. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अरहानने लिहिलं की, 'अनुष्का शर्मा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांप्रमाणे माझ्यावर ओरडत होती, किंचाळत होती. मी माझ्या कृतीबद्दल क्षमस्व आहे. परंतु, श्रीमती अनुष्का शर्मा यांनी थोडी सभ्यता आणि नम्र भाषेत मला हे सर्व सांगितले असते तर त्यांना कमीपणा आला नसता. मी तर चुकून रस्त्यावर कचरा टाकला. मात्र, तुमच्या तोंडातून जो कचरा बाहेर पडला त्याचे काय? तसेच हे सर्व शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विराट कोहलीच्या भंगार मनोवृत्तीचे काय?' अरहानच्या आईची संतप्त प्रतिक्रिया अरहान सिंहच्या आईने विराट आणि अनुष्कावर राग व्यक्त केला आहे. "माझ्या मुलाचा वापर या दोघांनी पब्लिसिटी मिळवण्यासाठीच केला आहे. सफाईच्या नावावर असा व्हिडीओ बनवून एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही," असं या पोस्टमधून त्यांनी सुनावलं आहे.व्हिडीओ शेअर करताना किमान मुलाचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होता, असंही त्या पुढे म्हणाल्या. तुम्हाला जर सफाईची एवढीच आवड असेल तर आधी तुम्ही राहत असलेल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काहीतरी करा, असा सल्ला या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विराट आणि अनुष्काला दिला आहे.

@anushkasharma @virat.kohli The last thing we would want is to get publicity out of your cheap STUNT in the name of CLEANLINESS! You both posted a video for your fans n followers by VIOLATING Basic Rights to privacy &you shamed my son in the video as well in your post content you both may be who you are in your fields, with millions of followers & all the PR backing you... you may be payed for your campaigning or maybe doing it for sheer publicity As a mother,I would like to state that you have not only shamed my son @arhhansingh on social media by not blurring his face, but youve also exposed him to unwanted hostility.... and danger from fanatics for such a small thing that you claim he has done but have no proof of anyways ? I am concerned about my sons SAFTEY !!! how dare you crush somebody’s image/and morale and reputation and expose him to public hate, a boy who is on the verge of starting his ventures, ..just to prove what good citizens you both are to increase your fan following ?How dare you?? If you both really cared or bothered about cleanliness , then you would actively do something about all the garbage in your own lane.. you would make a noise and use your VOICE to urge the municipal authorities to take action atleast in the lane where you live,to start with, which you haven’t . Posting videos of fake bravado just to fool your followers. If your intention was genuine then you would pull over and politely correct the person for littering IF THEY DID in a decent and real manner... and not by displaying such a rude and arrogant attitude, and then posting it for the world to see! You have caused a lot of grief with your post & this is morally and humanitarianly very wrong. You may be #AnushkaSharma or #viraatkohli in your house or on screen & the field...but on the streets you are just a citizen trying to correct another... DO IT WITH KINDNESS ....fear karma . And just FYI , he did not react badly, not coz of who you both are.. we couldnt care less,but only because he has a decent upbringing ! Unlike people like you, who seem to think that you are the empowered ones to talk and treat people as you wish !

A post shared by Gittanjali (@gittanjali.elizabeth) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget