Arbaaz Khan Wedding : बाबाच्या लग्नाला मुलगा पोहोचला! अरबाज खानच्या लग्नात जेनलियापासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत हजेरी
Arbaaz Khan Wedding : अभिनेता अरबाज खान गर्लफ्रेंड शुरा खानसोबत (Shura Khan) लग्नबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Arbaaz Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) त्याची गर्लफ्रेंड शुरा खानसोबत (Shura Khan) लग्नबंधनात अडकला आहे. मलायकापासून विभक्त झाल्यानंतर अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. अरबाजच्या लेकानेही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. अरबाज खानच्या लग्नात जेनलियापासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली.
अरबाज खान आणि शुरा खान यांचा लग्नसोहळा 24 डिसेंबर 2023 रोजी सलमानची बहिण अर्पिता खानच्या (Arpita Khan) घरी पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या हटके लूक्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अरबाज-शुराच्या लग्नात सेलिब्रिटींची मांदियाळी
अभिनेत्री रवीना टंडन अरबाज खानची जवळची मैत्रीण आहे. खास मित्राच्या लग्नसोहळ्यात रवीनाने निळ्या रंगाचा शरारा परिधान केला होता. रवीनाची लेक राशा थडानी आणि रणबीर थडानी यांनीदेखील हजेरी लावली होती. या शाही लग्नसोहळ्यात फराह खानदेखील उपस्थित होती. तिच्या ऑफ व्हाईट रंगाच्या कॉर्ड सेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
फराह खानचा भाऊ साजिद खानदेखील लग्नसोहळ्यासाठी अर्पिताच्या घरी आला होता. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख संपूर्ण कुटुंबियासह अरबाज-शुराच्या लग्नात उपस्थित होता. अरहान खानदेखील वडिलांच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होता.
बाबाच्या लग्नाला मुलगा पोहोचला!
अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नात त्याचा मुलगा अरहान खानदेखील (Arhaan Khan) उपस्थित होता. अरहान आपल्या वडिलांच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होता. सोशल मीडियावर तो एन्जॉय करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यात अरहानने सलमान खानसोबत 'तेरे मस्त मस्त दो नैन' या गाण्यावर डान्स केला आहे.
View this post on Instagram
अरबाज खान मलायका अरोरासोबत पहिल्यांदा लग्नबंधनात अडकला होता. 12 डिसेंबर 1998 मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. तर 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्यांच्या मुलाचं नाव अरहान खान आहे. मलायकासोबत विभक्त झाल्यानंतर आणि शुरासोबत लग्न करण्याआधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. अरबाजची पत्नी शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक मंडळी उपस्थित होते.
संबंधित बातम्या