(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: अरबाज आणि मलायकाचा मुलगा रवीनाच्या लेकीला करतोय डेट? अरहान आणि राशाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा!
Arhaan Khan And Rasha Thadani:
Arhaan Khan And Rasha Thadani: अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा मुलगा अरहान खान हा काही दिवसांपूर्वी अरबाज (Arbaaz Khan) आणि शूरा खान यांच्या लग्नात सहभागी झाल्यामुळे चर्चेत आला होता. सध्या अरहानच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अरहान नुकताच मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थंडानीसोबत (Rasha Thadani) स्पॉट झाला. या दोघांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
अरहान राशाला करतोय डेट?
अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान आणि रवीनाची मुलगी राशा थडानी हे मुंबईमध्ये एकत्र फिरताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अरहान पांढऱ्या टी-शर्ट आणि तपकिरी रंगाच्या ट्राऊजरमध्ये दिसला, तर राशा डेनिम ब्लू जीन्स आणि ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप अशा स्टायलिश लूकमध्ये दिसली. दोघेही कारच्या दिशेने वेगाने जाताना दिसले पण पापाराझींनी त्यांचे काही फोटो देखील काढले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता राशा आणि अरहान यांच्या डेटिंगची चर्चा होत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अरबाजच्या लग्नाला राशानं लावली हजेरी
सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खान आणि अरबाज खान यांच्या लग्नात राशा थडानी ही तिची आई रवीना टंडनसोबत पोहोचली होती. तसेच अरबाजच्या लग्नाला संपूर्ण खान कुटुंबानं हजेरी लावली होती.
राशा अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण
रवीना टंडनची मुलगी राशा ही अभिषेक कपूरच्या अनटाइटल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा ही तिच्या पहिल्या चित्रपटात साऊथ स्टार राम चरणसोबत (Ram Charan) स्क्रिन शेअर करणार आहे, असं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी राशानं स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. राशाचं स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आनंद व्यक्त केला होता.
अरबाज खान मलायका अरोरासोबत पहिल्यांदा लग्नबंधनात अडकला होता. 12 डिसेंबर 1998 मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. 2002 मध्ये मलायकानं अरहानला जन्म दिला. 2017 मध्ये अरबाज आणि मलायका हे विभक्त झाले.
इतर महत्वाच्या बातम्या: