एक्स्प्लोर
दबंग 3 मध्ये सोनाक्षीच्या भूमिकेवर सस्पेंस कायम

मुंबई: दबंग 3 मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या सहभागावर सस्पेंस अजूनही कायम असून, चित्रपटाचा दिग्दर्शक अरबाज खान यानेही यावर सूचक प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. दबंग 3 मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या सहभागावरून गेल्या काही दिवसांपासून विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. यावर अरबाजने सूचक प्रतिक्रीया व्यक्त करताना, तिचा चित्रपटातील सहभाग नसण्याचे वृत्त त्याने फेटाळले आहे. ''दबंगच्या आगामी सिक्वेलमध्ये काही बदल करण्यात येणार असून, या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप तयार झालेली नाही. या चित्रपटात काही नव्या चेहऱ्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे,'' असे अरबाज यावेळी म्हणाला. मात्र, सोनाक्षीच्या सहभागासंबंधी विचारले असता, त्यावर त्याने सूचक वक्तव्य केले. ''या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सर्व काही अवलंबून असून, प्रेक्षकांसाठी काही खास असणार आहे,'' असे तो यावेळी म्हणाला. 2010 साली प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दबंगच्या दुसऱ्या सिक्वेलमध्येही ती प्रमुख भूमिकेत दिसली होती.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















