एक्स्प्लोर
अनुष्का जेव्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा रडका चेहरा करुन दाखवते...
या सिनेमाच्या ट्रेलरमधील एक सीन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा चेहरा अत्यंत रडक्या स्वरात दिसत आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा आगामी सिनेमा 'सुई धागा'च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधील एक सीन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा चेहरा अत्यंत रडक्या स्वरात दिसत आहे. अनुष्काने प्रमोशनदरम्यान पुन्हा एकदा हीच पोज दिली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे. इंडियन आयडल 10 च्या सेटवर अनुष्का गेली होती. यावेळी शोमध्ये विशाल डडलानी आणि मनीष पॉल यांनी अनुष्काला सीन रिक्रिएट करण्याची विनंती केली. तिने लगेच ही विनंती मान्य केली.
'सुई धागा' हा सिनेमा सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मेक इन इंडिया अभियानावर आधारित आहे, ज्याचा उद्देश स्वदेशी कपड्यांना चालना देणं हा आहे. आपल्या देशात गेल्या काही वर्षात अनेक उद्योगपती समोर आले. स्टार्टअप आणि उद्योग हे मोठे पाऊलं आहेत, जे सिनेमात दाखवलेत, असं अनुष्का म्हणाली. या सिनेमात वरुण धवन आणि अनुष्का मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा 28 सप्टेंबर रोजी रिलीज होईल. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अनुष्का शर्माच्या लूकमुळे सिनेमा जास्त चर्चेत आला आहे. प्रमोशनमध्येही अनुष्काला याच लूकबद्दल विचारलं जात आहे.
आणखी वाचा























