Anurag Kashyap Post : करण जोहर सध्या त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो दीर्घकाळानंतर दिग्दर्शनाच्या जगात परतला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चित्रपट जगतातील सर्व सेलिब्रिटी या चित्रपटाचे खुलेपणाने कौतुक करत आहेत. आता या यादीत अनुराग कश्यपचेही नाव जोडले गेले आहे. 


चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकतेच 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी करण जोहरचे कौतुक केले आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट आपल्याला इतका आवडला आहे की त्याने तो दोनदा पाहिला आहे, असा दावाही अभिनेत्याने केला आहे. अनुरागने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.






अनुराग कश्यपने लिहिले, "करण जोहरचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.  करण जोहरचा हा दुसरा चित्रपट आहे ज्यासाठी मी दोन तिकिटे खरेदी केली आहेत. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे अशा 
सर्वांना मी हा चित्रपट पाहण्यास सांगत आहे. भन्नाट अभिनय करणारा रणवीर सिंग आणि प्रतिभावान आलिया भट्ट आणि त्यांची अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला आणखी छान बनवते. तसेच बऱ्याच काळानंतर बाॅलीवूडमध्ये असा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्यात खूप चांगले संवाद पाहायला मिळत आहे आणि याच संवादामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची एकतर्फी प्रेमकथा आणि मातृसत्ताक दाखवलेली जया बच्चन हा भाग मला सगळ्यात जास्त भावला आहे." पुढे अनुराग म्हणाला, “मी चित्रपट पाहताना मानमोकळेपणाने हसलो, रडलो, माझं उत्तम मनोरंजन या चित्रपटाने केलं. करणने त्याचं सर्वस्व पणाला लावून हा चित्रपट केला आहे हे यातून स्पष्ट होतं.” 


अनुराग कश्यपच्या या पोस्टवर यूजर्स त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. काही युजर्स चित्रपटाचा इतका चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत तर काहीजण करणच्या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचा आरोप करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आम्ही तुम्हाला गांभीर्याने घेणे बंद केले आहे. तर, खोटी प्रशंसा थांबवा." आणखी एका यूजरने लिहिले की, "चित्रपटाचे प्रमोशन थांबवा." आणखी एका यूजरने लिहिले की, "अनुराग कश्यप करण जोहरच्या चित्रपटाचे प्रमोशन करतोय,  विकासाची गरज आहे?"


 


इतर महत्वाच्या बातम्या