Rocky Aur Rani Ki Prem Kahani Song : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमातील 'तुम क्या मिले' (Tum Kya Mile) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरने (karan Johar) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. करण जोहरने हे गाणं यश चोप्रा यांना समर्पित केलं आहे. 'तुम क्या मिले' या गाण्यात रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 


'तुम क्या मिले' गाण्याबद्दल जाणून घ्या...


रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील 'तुम क्या मिले' हे गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अरिजीत सिंह आणि श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तर वैभवी मर्चेंटने या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. 






'रॉकी और रानी की प्रेम कहानी' कधी होणार रिलीज? (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date)


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या 28 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुम क्या मिले' हे गाणं रिलीज झाल्यापामुळे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आलिया, रणवीर आणि करण सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


संबंधित बातम्या


Tum Kya Mile Song: करण जोहरनं या व्यक्तिला डेडिकेट केलं 'तुम क्या मिले' गाणं; आलियाची मागितली माफी, म्हणाला, 'मुलीच्या जन्मानंतर...'