Karan Johar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करणच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकेतेने वाट बघत आहेस. करण जोहरनं थ्रेड्स (Threads app) हे नवीन अॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. या अॅपच्या आस्क मी अनिथिंग या सेशनमध्ये करणला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. चाहत्यांच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


थ्रेड्स या अॅपवर एका चाहत्यानं करणला प्रश्न विचारला, 'तुला वाटलेली सर्वात मोठी खंत कोणती?' चाहत्याच्या या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, 'मला माझ्या आवडत्या अभिनेत्री श्रीदेवी मॅडमसोबत काम करायला मिळालं नाही'


थ्रेड्स या अॅपवर एका नेटकऱ्यानं करणला प्रश्न विचारला, 'तू गे आहेस का?' नेटकऱ्याच्या या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, 'तू इंटरेस्टेड आहेस का?' करणच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






करणचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट कधी होणार रिलीज?


करणचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 चित्रपटांबरोबरच करण हा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. त्याच्या  'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. करण हा  'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाचे सात सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani: कुणी 25 कोटी तर कुणी 10 कोटी; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन