एक्स्प्लोर
हिंदी 'सारेगमप लिटील चॅम्प'मध्ये मराठी झेंडा, अंजली गायकवाड विजेती
नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली, हे तिघे मुख्य परीक्षक, तर 30 सदस्यांची ज्युरी जज या कार्यक्रमात होते. तर आदित्य नारायणने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली.
जयपूर : 'सारेगमप लिटील चॅम्प' या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये मराठी झेंडा फडकला आहे. अंतिम फेरीत अहमदनगरमधील अंजली गायकवाड विजयी झाली. अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्टाचार्य या दोघांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं.
जयपूरमध्ये 'सारेगमप लिटील चॅम्प'च्या 2017 च्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. कोण विजेता ठरणार, याची उत्सुकता शिगेल पोहोचली असतान, परीक्षकांनी थोडा सुखद धक्का दिला. प्रथम क्रमांकासाठी एक नव्हे, तर दोघांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राली अहमदनगर जिल्ह्यातील अंजली गायकवाडचाही समावेश आहे.
नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली, हे तिघे मुख्य परीक्षक, तर 30 सदस्यांची ज्युरी जज या कार्यक्रमात होते. तर आदित्य नारायणने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली.
गेल्या आठ महिन्यांपासून 'सारेगमप लिटील चॅम्प' बननण्यासाठी स्पर्धा सुरु होती. अंतिम फेरीत अंजली गायकवाड, श्रेयन भट्टाचार्य, शन्मुखप्रिया, धृन टिक्कू, वैष्णव गिरीश आणि सोनाक्षी कर या सहा जणांची निवड झाली होती. त्यानंतर जयपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement