एक्स्प्लोर
आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर
मुंबई: मारहाणप्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला झटका बसला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असून, त्याची जेलवारी टळली आहे.
आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, सध्या कोर्टाने आदित्य पांचोलीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी जेलवारी टळली आहे. आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला आहे. पुढील कोर्टात अपील करेपर्यंत ही जमानत असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement