Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), प्रभास (Prabhas) आणि  कमल हसन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाशी संबंधित एक कार्यक्रम बुधवारी पार पडला. या वेळी चित्रपटाची सगळी टीम उपस्थित होती. इतकंच नाही तर  या दरम्यान काही खास क्षणही दिसून आले. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या या चित्रपटाचे पहिले तिकिट खरेदी केले. त्याशिवाय सर्वांसमोर अमिताभ हे निर्मात्यांच्या पाया पडले. 


बिग बींनी खरेदी केले पहिलं तिकीट


अमिताभ बच्चन यांनी 500 रुपयांमध्ये चित्रपटाचे तिकिट खरेदी केले. यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान त्यांनी सहकार्य केल्याबद्दल निर्मात्यांचे कौतुकही केले. निर्माते सी अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना चित्रपटाचे तिकीट दिले.


निर्मात्याच्या पाया पडले...


या कार्यक्रमाच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी अश्विनी दत्त यांच्या पाया पडले. अमिताभ यांनी सांगितले की, आतापर्यंत ते जेवढ्या लोकांना भेटले आहेत, त्यात सगळ्यात विनम्र आणि  सरळ व्यक्तीमत्त्व असणारे दत्त आहेत. अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले की,  तुम्ही जेव्हाही सेटवर जाता तेव्हा तो तिथे पोहोचणारा ही पहिली व्यक्ती असते. तुम्हाला विमानतळावर घेण्यासाठी ते येतात जेव्हा त्यांना वाटते की या गोष्टीमुळे कलाकारांना काही त्रास होईल तेव्हा तो स्टंट करण्यास हरकत घ्यायचे, कलाकारांच्या  सुरक्षितेची काळजी घेतली गेलीय का, याकडेही त्यांचे लक्ष असायचे. कोणी अशा प्रकारचा विचार तरी करतो का असे म्हणत अमिताभ यांनी निर्माते सी अश्विनी दत्त यांचे आभार मानले. 


 






'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी यांचा समावेश आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे. 


इतर संबंधित बातमी :