Kalki 2898 Ad Copied Scene : प्रभास (Prabhas), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मल्टिस्टारर चित्रपट 'कल्कि 2898 AD' चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. 'कल्कि'च्या ट्रेलरवरून सिनेप्रेमीमध्ये जोरदार चर्चा सुरू  आहे. चाहत्यांना या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता लागली आहे. तर, दुसरीकडे आता 'कल्कि 2898 AD' या चित्रपटातील अॅक्शन दृष्ये ही हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर' या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीशी मिळताजुळता वाटत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


एका सिनेरसिकाने 'कल्कि 2898 AD' चा ट्रेलर पाहिल्यानंतर एक व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये चित्रपटाच्या प्रत्येक दृष्याबद्दल सांगण्यात आले आहे. ही सगळी दृष्ये ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर' फ्रेंजाईसीमध्ये दाखवण्यात आले आहे.'कल्कि 2898 AD' मध्ये प्रभासने ज्या प्रकारे 8-10 लोकांना एकाच वेळी लाथ मारून उडवतो, अगदी त्याच शॉट ख्रिस हेम्सवर्थने दिला आहे. दोन्ही अॅक्शन शॉट एकसारखेच  दिसतात. 




पाहा व्हिडीओ :


 






ख्रिस हेम्सवर्थच्या या चित्रपटातून कॉपी झालाय कल्कि 2898 AD मधील दृष्ये... 




काही चाहत्यांनी 'कल्की 2989 एडी' ची तुलना 'मॅड मॅक्स', 'स्टार वॉर्स' आणि 'चिल्ड्रन ऑफ मेन'शीही केली. ख्रिस हेम्सवर्थच्या ज्या चित्रपटांमधून 'कल्की 2898 एडी' चे सीन कॉपी केले गेले आहेत त्यात 'ॲव्हेंजर्स: एंडगेम', 'थॉर रॅगनारोक' आणि 'थॉर: लव्ह अँड थंडर' यांचा समावेश आहे. मात्र, प्रभास आणि ख्रिस हेम्सवर्थ या दोघांच्या दमदार परफॉर्मन्सचे चाहते कौतुक करत आहेत. एका चाहत्याने प्रभासला 'इंडियन सुपरहिरो' म्हटले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने थॉर आणि भैरवचे क्रॉसओवर लिहिले.


कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरचं होतंय कौतुक


 






'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला काशी नगरी पाहायला मिळत आहे. तसेच अमिताभ बच्चनदेखील दिसून येत आहे. पुढे दीपिका पादुकोणची झलक पाहायला मिळते. त्यानंतर प्रभासची दमदार एन्ट्री होते. कमल हासनच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या गोष्टीत महाभारताचे काही भाग दाखवले जाणार आहेत. चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक सीन धमाकेदार आहे. चित्रपटात जास्त प्रमाणात वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.