Amitabh Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा, अमिताभ लेकासाठी पोस्ट खास करत म्हणाले...
Amitabh Bachchan : सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आता अमिताभ बच्चन यांनी लेकासाठी पोस्ट केली आहे.
Amitabh Bachchan Shares Post For Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan ) यांच्या सध्या काहीच अलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या चर्चांना जोर आला आहे. नुकतीच अभिषेकने लाईक केलेल्या ग्रे घटस्फोटाच्या पोस्टनेही चांगलीच खळबळ माजली होती. अंबानींच्या सोहळ्यात देखील हे कुटुंब वेगवेगळं आलं होतं. म्हणजे अभिषेक, जया बच्चन, अमिताभ बच्चन, लेक, जावाई आणि लेकीचा लेक असा सगळा कुटुंब कबिला होता. पण सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र या सोहळ्यासाठी एकत्र आले होते.
पण आता यासगळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. लेकाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ही खास पोस्ट केली आहे. अभिषेकची पोस्ट त्यांनी पुन्हा शेअर करत त्याचं खास कौतुक केलंय. त्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये पुन्हा एका नव्या गोष्टीची चर्चा सुरु झालीये.
अमिताभ यांची पोस्ट काय?
अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडियावर अभिषेक बच्चनसाठी पोस्ट करत असतात. बिग बी अनेकदा आपल्या मुलाच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. बिग बींनी त्यांच्या एक्स हँडलवर अभिषेकशी संबंधित एक खास पोस्ट केली आहे. बिग बींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, 'अभिषेक तू खूप मस्त आहेस... खूप प्रेम तुला'.बिग बींनी हार्ट इमोजीही दिलं आहे. अभिषेकच्या फॅन पेजवर अभिषेकच्या ब्लफमास्टर, दासविन आणि प्लेअर्स या तीन चित्रपटांच्या फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. तिच पोस्ट अमिताभ यांनी रिशेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या देखील बऱ्याच कमेंट्स अभिषेकसाठी आल्या आहेत.
T 5080 - Abhishek you are too cool .. Love and more !! ❤️ https://t.co/qKzVHa92Cp
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 22, 2024
अभिषेकने लाईक केली होती घटस्फोटाबाबतची पोस्ट...
अभिषेक बच्चन याने इन्स्टाग्रामवर घटस्फोटांच्या प्रकरणावर भाष्य करणाऱ्या एका पोस्टला लाईक केले होते. त्यावरून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटांबाबत चर्चांना उधाण आले होते. या पोस्टमध्ये म्हटले होते की, प्रेम संपले की जोडपे सहज वेगळे होतात. त्यांना घटस्फोट घेण्यास कोणती गोष्ट भाग पाडते आणि इतके घटस्फोट का वाढत आहेत? घटस्फोट घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते. पण कधी कधी आपण विचार करतो त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. पण इतकी वर्षे एकत्र राहून लोक वेगळे झाल्यावर या दुःखातून कसे बाहेर पडतात, अशा आशयाची ही पोस्ट होती.