Amitabh Bachchan: 'ब्रा आणि पँटी...'; महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत बिग बींनी केलेलं जुनं ट्वीट झालं व्हायरल
बिग बींनी (Amitabh Bachchan) महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक ट्वीट शेअर केले होते. ते ट्वीट सध्या व्हायरल झालं आहे.
Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या एका जुन्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. 2010 मध्ये बिग बींनी महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक ट्वीट शेअर केले होते. या ट्विटवर आता अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. बिग बींच्या या जुन्या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट
2010 मध्ये अमिताभ बच्चन यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'इंग्रजी भाषेत 'ब्रा' एकवचनी आणि 'पँटी' अनेकवचनी का आहे?' अमिताभ बच्चन यांच्या या जुन्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटला सध्या अनेक नेटकरी रिप्लाय देत आहेत.
T26 -In the English language, why is 'bra' singular and 'panties' plural ...
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 12, 2010
नेटकऱ्यांनी दिला रिप्लाय
एका नेटकऱ्यानं अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'छान प्रश्न आहे बच्चन साहेब, तुम्ही हा प्रश्न केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये विचारु शकता.'
Didn't expect this💀 https://t.co/8ZaCymNSw3
— Anirudh Saxena (@Skinnybadger420) July 26, 2023
Good question Bachhan saab try this in next season of KBC https://t.co/8mLhSb24vX
— || (@__d_i_p) July 26, 2023
अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 48.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. बिग बी यांच्या ट्वीट्सला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. अमिताभ बच्चन हे ट्विटरवर विविध विषयांवर आधारित ट्वीट शेअर करतात.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता अमिताभ बच्चन हे केबीसीच्या नव्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 15 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बिग बी यांचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आता अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच त्यांच्या चाहत्यांना मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :