Amitabh Bachchan : आमचा छोटा मित्र, आम्हाला सोडून गेला'; अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले असून त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. बिग बींच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अमिताभ यांचा लाडक्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमिताभ यांनी कुत्र्यासोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"आमचा एक गोड छोटा मित्र...आमचा छोटा मित्र, हा मोठा झाला आणि आम्हाला सोडून गेला,". अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर 'पाळीव प्राणी खूप गोड असतात', 'पाळीव प्राणी आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात', 'पाळीव प्राणी हे मौल्यवान असतात', अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येदेखील लिहिलं आहे,"मच्या चिमुरड्या मित्राचं असं मध्येच कायमचं निघून जाण्यानं खूप दुःख झालं आहे. जेव्हा तो आमच्या आसपास असायचा तेव्हा चैतन्य असायचं". याआधी 2013 साली बिग बींच्या 'शानौक' या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता.
पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचं अमिताभ बच्चन यांना खूप वाईट वाटलं असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा यांच्यात छान ऋणानुबंध निर्माण होतात. त्यामुळे आता पाळीव कुत्राच्या निधाणाने अमिताभ यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या