Amitabh Bachchan and Ajay Devgan : बिग बी आणि अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचं नाव बदललं; फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच एका आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.
Amitabh Bachchan And Ajay Devgan Movie Mayday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच एका आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव मे-डे (MayDay)असे ठेवण्यात आले होते. पण आता चित्रपटाचे नाव बदललं असून 'रनवे 34' (Runway 34) असं केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर 'रनवे 34' चित्रपटाचा पोस्टर शेअर केला.
'रनवे 34' या चित्रपटात अजय आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून लिहीले, 'मे-डे आता रेनवे 34 आहे.' या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: अजय देवगणने केले आहे. एका मुलाखतीमध्ये अजयने सांगितले होते की, 'या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासोबत काम करून खूप आनंद झाला.'
View this post on Instagram
अजय देवगणचे रनवे -34 बरोबरच थँक गॉड, मैदान, रुद्र आणि दृश्यम 2 हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गोलमाल अगेन, टोटल धमाल, सिंघम रिटर्न्स , सिंघम, गोलमाल 3,बोल बच्चन,सन ऑफ सरदार,रेड, शिवाय या अजयच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नुकतीच अजयने अभिनय क्षेत्रात 30 वर्ष पूर्ण केली आहेत. त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
हे ही वाचा :
- Bigg Boss Marathi 3 : आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'नॉक आऊट' हे नॉमिनेशन कार्य
- Radhe Shyam Song Teaser : 'आशिकी आ गई' गाण्याच्या टीझरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडेची रोमँटिक केमिस्ट्री
- Salman Khan visits Sabarmati Ashram : 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान थेट बाबूंच्या आश्रमात, चरखा चालवत म्हणाला...






















