Amit Jani: ‘कराची टू नोएडा’ चं शूटिंग सुरु; सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवणारे अमित जानी म्हणाले, "राज ठाकरेंना सांगू इच्छितो, मी 19 तारखेला मुंबईमध्ये येत आहे."
‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी एक व्हिडीओ शेअर करुन मनसेवर टीका केली आहे.
Amit Jani: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन (Sachin Meena) या जोडप्यावर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी सीमा हैदरच्या चित्रपटाबाबत एक ट्वीट केलं होतं. आता ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी एक व्हिडीओ शेअर करुन मनसेवर टीका केली आहे.
अमित जानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते धमक्या देत आहेत की, चित्रपट निर्माते जर ‘कराची टू नोएडा’ हा चित्रपट बनवतील तर ते आम्हाला त्यांच्या स्टाईलनं उत्तर देतील. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, हे थांबवा नाही तर राडा होईल. मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की, या धमक्यांनी तुम्ही जे गरीब, मजूर आहेत त्यांना घाबरवू शकता. पण चित्रपट निर्माता अमित जानीला घाबरवू शकत नाही."
पुढे अमित जानी म्हणतात, "तुम्हाला कशाचा त्रास होतोय हे मला कळतंय. तुम्हाला या गोष्टीचा त्रास होत नाही की, कराची टू नोएडा हा चित्रपट बनत आहे. पण तुम्हाला याचा त्रास होतोय की, ही कथा अमित जानीनं घेतली आहे. तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय की, आतापर्यंत महाराष्ट्राचे लोक, मराठी माणूस चित्रपट बनवत होता. पण हा चित्रपट उत्तर प्रदेशचा एक माणूस बनवत आहे '
पाहा व्हिडीओ:
"राज ठाकरेंना हे सांगू इच्छितो की, मी 19 तारखेला मुंबईमध्ये येत आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही मुंबईमध्ये या चित्रपटावर काम करणार आहोत." अमित जानी यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठकरे यांनी मनसेवर टीका केली आहे.
अमेय खोपकर यांनी शेअर केलं होतं ट्वीट
अमेय खोपकर यांनी यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: