Allu Arjun : अल्लू अर्जुन 16 दिवसांनी दुबईहून घरी परतला, लेकीने केले हटके स्वागत

Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या यशानंतर 16 दिवसांनी दुबईहून घरी परतला आहे.

Continues below advertisement

Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. टॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुन 16 दिवसांनंतर दुबई दौरा संपवून भारतात त्याच्या घरी परतला आहे. घरी पोहोचल्यावर त्याची लेक अरहानेचं त्याचं हटके स्वागत केलं आहे. 

Continues below advertisement

17 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला 'पुष्पा' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. अल्लू अर्जन नेहमीच मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याने  त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनची मुलगी अरहा दिसत आहे. तिनं फुलांचा वापर करुन जमिनीवर 'वेलकम नाना' असा खास संदेश लिहिला आहे.

अरहाचा फोटो शेअर करत अल्लू अर्जुनने लिहिले आहे,'परदेशात 16 दिवस राहून घरी आल्यानंतर एवढं गोड स्वागत'. अल्लू अर्जुनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनची मुलगी बालकलाकार असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

संबंधित बातम्या

Tom Cruise's Space Film : Tom Cruise's Space Film :आता अंतराळात होणार टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे शूटिंग

Why I Killed Gandhi या चित्रपटावर बंदी आणावी, मौलाना आझाद विचार मंचने केली मागणी

Bigg Boss 15 Finale : पाचही स्पर्धक प्रबळ दावेदार, कोणाच्या गळ्यात पडणार ‘बिग बॉस 15’च्या विजेतेपदाची माळ?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola